सदावर्तेंकडून एसटी कष्टकरी जनसंघाची घोषणा; राष्ट्रवादीला देणार टक्कर
मुंबई : एसटी संपाचे वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavrte) आता एसटी बँकेची (ST Bank) निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी त्यांनी आपले स्वतःचे पॅनल उभं करणार आहेत. दरम्यान त्यांनी आज (ता.9 मे) एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेची घोषणाही केली आहे. आता या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवल्या जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Gunratan Sadavarte Latest News)
सदावर्ते हे 26 एप्रिलला जामिनावर बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. एसटी बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते स्वतःचे पॅनल उभे करणार असून त्यासाठी त्यांनी तयारीही सुरु केली आहे. राज्यात एसटी बँकेचे तब्बल 90 हजार मतदार आहेत. या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) प्रणित एसटी कामगार संघटनेची आजघडीला सत्ता आहे. याच संघटनेच्या विरोधात सदावर्तेंती शड्डू ठोकला आहे. त्यामुळे सदावर्ते लवकरच सक्रिय राजकारणात येणार हे स्पष्ट झाले आहे.
आपल्या संघटनेच्या नावाच्या घोषणेनंतर सदावर्ते म्हणाले की, वारंवार आम्हाला सांगण्यात आलं की गिरणी कामगारांसारखी आमची आवस्था होईल. मात्र आम्ही लढाई लढत राहिलो. पण कोर्टाने आम्हाला निर्णय दिला. गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली असून देशात एक मोठं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांनी केला. गांधी यांनी अखेरचा श्वास सोडताना श्रीराम म्हटल जातं मात्र, ज्यावेळी नथुराम गोडसे यांची कोर्टात ट्रायल झाली त्यावेळी गोडसेंनी स्पष्ट केलं की गांधी यांनी श्वास सोडताना कधीही हे राम म्हणटल नव्हतं. आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला गेला असल्याचे सदावर्ते म्हणाले.
आतापर्यंत राजकीय पक्षाच्या आधारावरील कर्मचारी संघटना आहेत. आता कष्टकऱ्यांच्या कर्मचारी संघटना असेल. NIA, CBI ने रझा आकदमीचा तपास करावा. महाविकास आघाडी सरकारने नवाब मलिक यांना का निलंबित केलं नाही? मात्र, कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. दुसरी पत्रकार परिषद घेण्याआधी सगळ्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्या, असा इशाराही सदावर्तेंनी सरकारला दिला. तर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांवरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, संजय राऊत तुम्ही पत्रकार आहात. राम मंदिर व्हावं म्हणून त्या केसमध्ये आम्ही दोघे वकील होतो. मी आणि जयश्री आम्ही रामजन्म भूमीच्या लढ्यात सहभागी होतो. राऊत तुम्ही माफी मागा नाही तर आम्ही कोर्टात जातो, असा इशाराही त्यांनी राऊतांना दिला.
दरम्यान, एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे यांनी एसटी बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली. एसटी संपात हजारो कामगारांवर कारवाई झाली. त्यामुळे हजारो सदस्यांना मतदान करता येणार नाही. या कारणामुळे त्यांनी पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक प्राधिकरणाकडे केली. यावर सदावर्ते म्हणाले की, आगामी काळात आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटणार आहोत. कारण सध्या या सरकारनं सांगितलं की अनेक कर्मचारी कर्जबाजारी आहेत त्यामूळे ते मतदान करु शकणार नाहीत. मात्र असा कुठलाही नियम नाही. ही बाब आम्ही सहकर मंत्र्यांच्या लक्षात आणुन देवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.