व्हिडीओ काॅलवर बोलतानाही मुख्यमंत्र्यांनी अण्णांना वाकून नमस्कार केला...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी आज राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना दुरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
Eknath Shinde & Anna Hazare
Eknath Shinde & Anna HazareSarkarnama

मुंबई - काही महिन्यांपू्र्वी राज्य सरकारने लोकायुक्त कायदा लागू करावा या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी आज राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना दुरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. Anna Hazare News Update

दूरध्वनीवर मुख्यमंत्री शिंदेंनी अण्णा हजारे यांना हात जोडून नमस्कार केला. यावर अण्णा हजारे यांनी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत असे सांगितले. यावर तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा असू द्या, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

अण्णा हजारे म्हणाले, तुम्ही आतापर्यंत केलेल्या कामाची मुख्यमंत्रीपद ही पावती आहे. यावर शिंदेंनी सांगितले की, तुम्ही मार्गदर्शन राहू द्या. जेव्हा वाटेल त्यावेळी आदेश द्या. सूचना करा. राज्याच्या हितासाठी राज्यातील जनतेला अपेक्षित असे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी, देवेंद्र फडणवीस व आमचे सहकारी यांना तुम्हाला ज्या ज्या वेळी वाटेल त्यावेळी हक्काने आदेश द्या, असे त्यांनी नम्रपणे हातजोडून सांगितले.

Eknath Shinde & Anna Hazare
लोकायुक्त कायदा करा अन्यथा पायउतार व्हा : अण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

तुमचे काम चांगले आहे मात्र चांगल्या कामाला दृष्ट लवकर लागते. चांगले जनहिताचे काम करीत रहा, असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.

त्यामुळे शिंदे यांच्या कार्यकाळाला कोणाची दृष्ट लागणार, अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना काय सुचवायचे होते, अण्णा हजारे लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलन करणार का? यावर उलट सुलट चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com