विनोद निकोले म्हणाले, मी महाविकास आघाडी बरोबरच...

आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी 'मी महाविकास आघाडी सोबतच आहे', असे स्पष्ट केले.
MLA Vinod Nikole Latest Marathi News
MLA Vinod Nikole Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई - राज्यातील शिवसेनेचे आमदार कालपासून भाजपच्या गोटा जाऊन शामिल झाले आहेत. त्यामुळे शिवसेने समोर मोठा राजकीय व घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी भाजपजवळ गेलेल्या शिवसेना आमदारांच्या टोळ्यात अंजन घातले आहे. तसेच आपण महाविकास आघाडी बरोबरच राहणार हे स्पष्ट केले आहे. ( Anjan in the eyes of the Shiv Sena MLAs who were put by the Marxist Communist Party MLAs: said ... )

आमदार कॉम्रेड विनोद निकोले म्हणाले, "राज्यात ज्या घडामोडी सुरू आहेत, यात महाविकास आघाडीतून शिवसेनेचे मोठ्या संख्येत आमदार भाजपच्या गोटात गेले आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटाचा सामना करत होतो. आता कुठे परिस्थिती सुधारली होती. सर्वसामान्यांचे प्रश्न, बेरोजगारी याकडे लक्ष देण्यासाठी सध्या राज्य सरकारला वेळ मिळाला होता. मात्र मध्येच ही घटना झाली. हे फार चुकीचे आहे," अशी भूमिका त्यांनी मोडली. Vinod Nikole News Update

MLA Vinod Nikole Latest Marathi News
Video: मी 'मविआ' सोबतच असेन; विनोद निकोले

ते पुढे म्हणाले की, "मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आमदार म्हणून माझी भूमिका स्पष्ट आहे की, राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीलाच मतदान केले आहे. यापुढेही मी महाविकास आघाडी बरोबर आहे. मात्र सामान्य लोकांना प्रश्न भेडसावत आहेत. महागाई वाढली आहे. शाळा सुरू झाल्या आहेत. शाळांत मुलांचे प्रवेश होत नाहीत हे पाहता. राज्यात या ज्या राजकीय घटना घडत आहेत. त्या फार चुकीच्या आहेत. सामान्य जनता लोकप्रतिनिधींना चांगले सरकार चालवतील म्हणून निवडून देतात. सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडून देतात. मात्र तसे होताना दिसत नाही. राजकीय पदासाठी चाललेली धावपळ योग्य नाही," अशी टीका त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in