ठाकरेंनी केला संजय राठोडांचा 'करेक्ट कार्यक्रम'; सेवालाल महाराजांचे वंशज अनिल राठोडांनी बांधले शिवबंधन

Uddhav Thackeray News : अनिल राठोड यांचा पक्षप्रवेश मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मोठा धक्का आहे.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama

मुंबई : संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी शनिवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत अनिल राठोड यांनी पक्षात प्रवेश केला. या वेळी ज्येष्ट नेते अनंत गिते आणि खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. अनिल राठोड यांचा पक्षप्रवेश बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) पक्षाचे आमदार आणि मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मोठा धक्का आहे.

या वेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली आहे. रोज दिग्गज आणि साधी माणसे पक्षात येत आहेत. वेगवेगळ्या विचारांची माणसे प्रवेश करत आहेत. त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होते आहे. इथे अनंत गिते आणि अरविंद सावंत हे जुने नेते आहे. ते जुने आणि जाणते आहेत. नुसता जुना शब्द नको, जुने असून चालत नाही. जाणते हा शब्द महत्त्वाचा आहे. जाणते म्हटल्यावर या परिस्थितीत काय केले पाहिजे हे त्यांना माहीत आहे, असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray News
Modi : पंतप्रधान मोदी नागपुरात करणार समृद्धी आणि मेट्रोचे लोकार्पण, फडणवीसांनी घेतला आढावा...

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या राठोडांना खिंडीत गाठण्यासाठी ठाकरेंनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मागील ३ महिन्यात उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांशी संबंधित ३ मोठ्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. यात पोहरादेवी गडावरील महंत सुनील महाराज, त्यानंतर दिग्रसचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख, त्यानंतर आता थेट बंजारा समाजात मानाचे स्थान असलेल्या सेवालाल महाराज यांच्या वंशजांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

Uddhav Thackeray News
Tukaram Gadakh : नगर लोकसभेत राष्ट्रवादीला विजय मिळवून देणारा नेता काळाच्या पडद्याआड

त्यामुळे ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. यातून संजय राठोड यांना शह देण्यासाठी ठाकरे यांनी चहूबाजूंनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता बंजारा समाज नेमका कोणाच्या बाजूने उभं राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com