अर्धी प्रतिज्ञापत्रे फॉरमॅटमध्ये तर आर्धी नाही..असं कसं..परब म्हणाले...

Anil Parab : निवडणुका कधीही होवू देत आम्ही त्यासाठी तयार...
Former  Minister Anil Parab Latest Marathi News
Former Minister Anil Parab Latest Marathi News Sarkarnama

मुंबई : शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांच्या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं असून दोन्ही गटाला अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन नावं देण्यात आली आहे. (Former Minister Anil Parab Latest Marathi News )

दरम्यान, आता शिवसेना कुणाची हा वाद आता न्यायालयात आणि आता निवडणूक आयोगात गेला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना,असा दावा केला आहे. यासाठी दोन्ही गटांकडून न्यायालयात पुराव्यासाठी विविध कागदपत्रे सादर केली आहे. शिंदे आणि ठाकरे गटाकडून पक्षाच्या लाखो सदस्यांमार्फत पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत. मात्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामधील सुमारे अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये नसल्याने निरुपयोगी ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर ठाकरे गटाकडून माजी मंत्री अनिल परब यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Former  Minister Anil Parab Latest Marathi News
शिक्षणमंत्री केसरकरांची पाडव्याच्या मुहूर्तावर मोठी घोषणा; शालेय विद्यार्थ्यांना येणार अच्छे दिन...

परब म्हणाले की, आम्ही सुमारे ८ लाख प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाला दिली आणि ती एकाच फॉरमॅटमध्ये भरली आहेत. यातील अर्धी योग्य आहेत व अर्धी फॉरमॅटमध्ये नाहीत, हे असं कसं होवू शकते? याविषयी अजून निवडणूक आयोगानं आम्हाला काही कळवलं नाही, असे मत त्यांनी याविषयी व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली याबाबत ते म्हणाले की, दिवाळी सण जसा घरच्यांबरोबर साजरा करतो, तसाच कार्यकर्त्यांसोबतही साजरा करतो. तेव्हाच आम्हाला दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटते. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. लोकांमध्ये जावून प्रश्न समजून घ्यायचा जसा सत्ताधा-यांना तसा विरोधकांनाही तो अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांबरोबर दिवाळी साजरी केली असेल तर त्यांचे प्रश्नही समजून घेतले असतील तर चांगली गोष्ट आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. तसेच निवडणुका कधीही होवू देत आम्ही त्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Former  Minister Anil Parab Latest Marathi News
मल्लिकार्जुन खर्गे अॅक्शन मोडवर; अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच मोठी घोषणा

दरम्यान, सुमारे अडीच लाख प्रतिज्ञापत्रे निकामी ठरली असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाकडून 8.5 लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे जमा करण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रे जमा करण्यात ठाकरे गटाने आघाडी घेतली असली तरी ती निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये ती प्रतिज्ञापत्र नसल्याने तब्बल अडीच लाख अर्ज निरुपयोगी ठरल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अद्याप ठाकरे गटाला अधिकृत माहिती मिळीली नसल्याचं परबांनी (Anil Parab) सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com