अनिल परबांचे घूमजाव, खासगीकरणाचा विचार नाही.. तो तर पर्याय

आवाहन करूनही जे रोजंदारी कर्मचारी हजर राहिले नाहीत. त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असल्याचे परब (Anil Parab) यांनी सांगितले आहे.
अनिल परबांचे घूमजाव, खासगीकरणाचा विचार नाही.. तो तर पर्याय
Anil Parab Sarkarnama

पुणे : 'एसटी (S.T) कामगारांचे प्रश्न सोडवून 'एसटी'ला रूळावर आणण्यासाठी विविध पर्यायाचा विचार केला आहे. याबाबत संबधित सल्लागार कंपनीला सुचना दिल्या आहे. एसटी खासगीकरणाचा (S.T Privatization) अद्याप विचार नाही. तो एक पर्याय आहे. असे म्हणत, परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी खासगीकरणाच्या मुद्द्यावरून घूमजाव केले आहे. तसेच, विलीनीकरणाबाबतचा निर्णय हा समितीच घेईल. आंदोलना संदर्भात चर्चा नेमकी कुणाशी करायची? आंदोलक ना युनियनचे ऐकतायत ना भाजप नेत्यांचे, एसटीचे आंदोलन (S.T Agitation) हे नेतृत्वहीन झाले आहे, असे मत त्यांनी आज (ता.19 नोव्हेंबर) केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

Anil Parab
माझ्या लेकराला काही झाले तर, जगातील कोणतीही आई सरकारला सोडणार नाही...

अनिल परब म्हणाले, कामगारांनी सांगावे की, कुणाशी बोलावे. त्यांच्याशी बोलायला आम्ही तयार आहोत. गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोनदा बोललो. पण त्यानंतर संपर्क नाही. त्यांनी कामगारांना आझाद मैदानात आणले आहे. त्यापेक्षा सरकारशी चर्चा करा, असे आवाहन परब यांनी केले. याबाबतचा निर्णय कामगारांनी घ्यायचा आहे. वेतनासंदर्भात इतर राज्यांचा अभ्यास केला जात आहे. तेथील वाहतूक व्यवस्था, कर्मचा-यांचे वेतन व एसटीचे उत्पन्न वाढवण्यासीठी याचा आढावा घेतला जात आहे.

Anil Parab
ठाकरे सरकार झाले कठोर : संप मिटला नाही तर ST चे खासगीकरण

काल (ता.18 नोव्हेंबर) झालेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत एसटीचे उत्पन्न कसे वाढवता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, विविध पर्याय काय आहेत याबाबत याची चाचपणी केली. मात्र, अद्याप कुठलाही खासगीकरणाचा विचार नसल्याचे परब यांनी स्पष्ट केले. याबरोबरच देवेंद्र फडणवीस यांनी प्रवाशी कराचा सांगितलेला फॉर्म्यूला आम्ही गांभीर्याने घेतला आहे. मात्र, हा फॉर्म्यूला कोरोनापूर्व काळात शक्य होता. आता खूप मोठा गॅप पडला आहे. शासनाचे आर्थिक गणित पाहूनच याबाबत निर्णय घेतला जाईल. आताही तो करता येईल. मात्र, त्यासाठी संप मागे घ्यावा लागेल असे परब म्हणाले. याबरोबरच ते म्हणाले की, 24 तासांत कामावर आवाहन करूनही जे रोजंदारी कर्मचारी हजर राहिलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाचे 8 अधिकारी आंध्रप्रदेश, तेलंगणाच्या अभ्यास दौऱ्यावर होते.आंध्र प्रदेश, तेलंगणा येथे एसटी चे खासगीकरण कसे करण्यात आले. याचा अभ्यास या दौऱ्याच्या निमित्ताने सुरू आहे. त्यामुळे एसटीच्या बस ह्या खासगी चालकांना देण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र, आज परब यांनी आज खासगीकरण फक्त एक पर्याय असल्याचे सांगत घूमजाव केले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in