शिवसेनेला मतफुटीची धास्ती: अनिल परबांनी आमदारांना केल्या महत्त्वाच्या सूचना

Vidhan Parishad Elelction| Shivsena| विधान परिषद निवडणूकीत मतफुटीचा धोका टाळण्यासाठी राज्यसभा निवडणुकीनंतर आमदारांना पुन्हा हॉटेल मुक्कामी ठेवण्यात आले आहे
Anil Parab
Anil Parab

मुंबई : राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणूकीला दोन दिवस राहिले आहेत. या दृष्टीने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. एकही आमदार फुटू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सुचनेनुसार शिवसेनेचे आमदार पवईच्या वेस्टीन हॉटेल मध्ये दाखल झाले आहेत.

मतफुटीचा धोका टाळण्यासाठी राज्यसभा निवडणुकीनंतर अवघ्या आठवड्याभरात आमदारांना पुन्हा हॉटेल मुक्कामी ठेवण्यात आले आहे. पुढचे दोन दिवस आमदारांचा मुक्काम याच हॉटेलमध्ये असणार आहे. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री अनिल देसाई आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे महत्त्वाचे नेते देखील या आमदारांसोबत आहेत. याच हॉटेल मध्ये उद्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक देखील होणार आहे... या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

Anil Parab
अधिकारी माफियांसोबत सामील झाल्याने सर्वसामान्यांचे जीव धोक्यात…

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत अनिल देसाई आणि अनिल परब यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. अननोन फोन उचलू नका,फोन सहसा बंद ठेवा, हॉटलवरच थांबा, अननॉन व्यक्तीला हॉटेल रेनिसन्समध्ये बोलावू नका. चर्चा बाहेर जाऊ नये याची काळजी घ्या, अश्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

राज्यसभा निवडणूकीनंतर आता विधानपरिषद निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी 11 उमेदवार मैदानात उतरले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवारांना संधी दिली आहे. शिवसेनेकडून सचिन अहिर, आमशा पाडवी, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजकडून प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, उमा खापरे आणि राम शिंदे हे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com