अनिल परब यांच्या अडचणी वाढणार? मुरुडमधील पुराव्यांचा दारुगोळा घेवून ईडीचे पथक मुंबईत

Anil Parab | रिसॉर्ट प्रकरणावरुन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती.
Anil Parab Latest News
Anil Parab Latest NewsSarkarnama

दाभोळ : दापोली तालुक्यातील मुरूड येथील बहुचर्चित साई रिसॉर्टवरुन ईडीच्या रडारवर आलेल्या शिवसेना (Shivsena) मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुरुड येथे या रिसॉर्टसंबंधी चौकशी करण्यासाठी आलेले ईडीचे पथक जवळपास ७ दिवसांनंतर मुंबईत परतले आहे. मागील आठवड्यापासून हे पथक दापोली व खेड परिसरात तळ ठोकून होते. या तपासादरम्यान ईडीने मुरूड ग्रामपंचायत, दापोली उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय अशा ठिकाणी जाऊन पुरावेरुपी कागदपत्रे जमा केली आहेत. (Shivsena | Anil Parab Latets News)

याशिवाय दापोलीतील जागा खरेदी विक्री करणाऱ्या एका एजंटचीही चौकशी होणार असल्याची चर्चा आहे. मागील आठवड्यात याच रिसॉर्ट प्रकरणावरुन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. या छापेमारी दरम्यान ईडी पथकाने परब यांची तब्बल १३ तास चौकशी केली होती. दरम्यान आता ईडीच्या पथकाने या रिसॉर्ट प्रकरणी थेट मुरुरमध्ये जावूनच तपास केला आहे.

भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला माजी खासदार किरीट सोमय्या आरोप करत असलेल्या साई रिसॉर्ट आणि सी कोच रिसॉर्टवर केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हे पत्र ३१ मे २०२२ रोजी राज्य सरकारला पाठवले आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता अधिक आहे. राज्याने केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल पर्यावरण मंत्रालयाला सादर करण्याची मागणी या पत्राद्वारे केली आहे.

यासंबंधी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जानेवारी २०२२ ला केलेल्या तक्रारीनंतर, कोस्टल झोन नियम मोडल्याचे सांगत राज्य सरकारला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या कारवाईचा अहवाल मागवण्यात आला आहे. राज्य सरकारने काय कारवाई केली आहे, अशी विचारणा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या पत्रावर राज्य सरकार नेमके कोणते उत्तर देणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर या रिसॉर्टप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. २०१७ मध्ये एक कोटी रुपये खर्च करून मंत्री अनिल परब यांनी विभास साठे यांच्याकडून दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्याला लागून असलेली साई रिसॉर्टची जमिन खरेदी केली. पुढे २०१७ ते २०२० या काळात साई रिसॉर्टवर २५ कोटी रुपये खर्च केले.

पण ३० डिसेंबर २०२० रोजी रिसॉर्ट आणि सदर जागा अनिल परब यांनी त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना १.१० कोटी रुपयांत विकली आणि करार शेतजमिन म्हणून केल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. याशिवाय हे रिसॉर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचा भंग करण्यात आल्याची तक्रारही किरीट सोमय्या यांनी केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाकडे केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com