दसरा मेळाव्याचे काय होणार? अनिल परबांनी स्पष्टच सांगितले

शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याचे भवितव्य आता उच्च न्यायालयाच्या (High Court) हातात आहे.
Anil Parab
Anil Parab sarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याचे भवितव्य आता उच्च न्यायालयाच्या (High Court) हातात आहे. शिवसेना नेते अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शिवतीर्थावर मेळावा घेण्यास आम्हाला आडकाठी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला न्यायालयाकडून परवानगी मिळेल, असेही परब यांनी सांगितले.

न्यायालय आम्हाला पुन्हा परवानगी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेने पर्यायी जागा पाहिली नसल्याचे परब यांनी सांगत दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल परब म्हणाले, उद्या उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सध्या सुरू असलेला प्रकार हा दसरा मेळाव्याला अपशकून करण्याची वृत्ती आहे.

Anil Parab
Aurangabad : राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश..

1966 पासून दसरा मेळावा होत आहे. यामध्ये आडकाठी केली जात आहे. दसरा मेळाव्यासाठी विविध प्रकरणात आम्हालापरवानगी मिळाली आहे. न्यायालयात उद्या युक्तिवाद होईल. आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई महापालिकेने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे सांगत शिवसेना, शिंदे गटाला परवानगी नाकारली. त्यावरही परब यांनी टीका केली. संघर्षाच्या ठिणग्या फक्त दादरमध्ये झडतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वांद्रे-कुर्ला संकुलात त्यांचा मेळावा आहे. मग, त्याच वांद्रेत 'मातोश्री'देखील आहे, असे सांगत परब यांनी महापालिकेच्या निर्णयावर टिका केली.

बुधवारी नेस्को मैदानात गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याने शिवसेनेला ओरखडा पडलेला नाही, हे सिद्ध झाले. गटप्रमुखांच्या मेळाव्याला झालेल्या गर्दीने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचेही परब म्हणाले.

Anil Parab
गटप्रमुख मेळावा तो सिर्फ झाकी है, दसरा मेळावा अभी बाकी है; मेळावा 'शिवतीर्था'वरच होणार...

दापोली रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नसल्याचे परब यांनी सांगितले. या प्रकरणात सर्व चौकशी झाली. न्यायालय आदेश देईल ते बंधनकारक आहे. आम्ही भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना बंधनकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. सदानंद कदम हेच त्या रिसॉर्टचे मालक आहेत. ते याबाबत बोलतील असे परब यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com