एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ जाहीर : 3600 ते 7200 रुपयांनी वेतन वाढणार

विलीनीकरणाबाबत न्यायालयाने स्थापन केलेली समिती जो निर्णय घेईल तो मान्य असल्याची अनिल परब (Anil Parab) यांची घोषणा
एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ जाहीर : 3600 ते 7200 रुपयांनी वेतन वाढणार
Anil Parabsarkarnama

मुंबई : गेली 15 दिवस एसटी मंहामंडळाचा संप सुरु आहे. या संपासंदर्भात तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा केली.

पत्रकार परिषदेला परब यांच्या सोबत शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर उपस्थित होते. यावेळी परब म्हणाले, या संपामध्ये कर्मचाऱ्यांनी परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकर करावे, अशी मागणी केली होती. त्या संदर्भात हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी समिती स्थापन केली होती. त्या समितीने १२ आठवड्यात निर्णय द्यावा असे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने ही समती जो निर्णय घेईल ती मागणी मान्य असेल असे सांगितले होते. मात्र, तो पर्यंत संपावर काही निर्णय होणे गरजेचे आहे.

समितीने जर विलिनीकरणाचा निर्णय दिला तर आम्ही विलीनीकर करु. मात्र, तो पर्यंत पगावर कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात वाढ केली जाणार आहे. जे कर्मचारी १ ते १० वर्ष काम करत आहेत. त्यांच्या मूळ वेतनात ५००० रुपये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या एकूण पगाराच ७२०० रुपयाची वाढ होणार आहे. जे कर्मचारी १० ते २० वर्षे सेवेत आहेत. त्यांच्या मूळ वेतनात चार हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यांचा एकूण पगार आता २८ हजार होणार आहे. ज्यांचे मूळ वेतन ३६ हजार होते. त्याचे एकूण वेतन ५६ हजार रुपये होणार आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे, असे परब यांनी स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांच्या भावनांचा आदर करुन पगारवाढ केली आहे. आज जी काही दिवसभर चर्चा झाली त्यामधून हा निर्यण घेण्यात आल्याचे परब यांनी सांगितले. आतापर्यंतची ही सगळ्यात चांगली वाढ आहे. २ हजार ७०० कोटी रुपयांची मदत राज्यशासनाने दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार १० तारखेपर्यंतच होईल, अशी हमी राज्य सरकार देत आहे. एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिकांच्या पगारात सुमारे रुपयांपासून ७२०० (४४.७२% ) ३६०० (६.९४%) रूपयांपर्यंत घसघशीत वाढ होणार आहे. मूळ पगारात कर्मचाऱ्यांच्या वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येईल. घरभाडे, भत्ता, राज्यसरकारच्या कर्मचार्याप्रमाणे देण्यात येणार आहे. एसटीच्या इतिहासात सर्वात मोठी ही पगारवाढ असल्याचा दावा परब यांनी केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in