माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कारागृहात गंभीर दुखापत

उपचारासाठी त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Anil Deshmukh
Anil Deshmukhsarkarnama

मुंबई : शंभर कोटी वसुली प्रकरणावरुन कारागृहात (jail)असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनिल देशमुख हे कारागृहात चालत असताना पडले त्यामुळे त्यांच्या खाद्यांला गंभीर दुखापत झाली आहे. जे.जे. रुग्णालयात त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. शुक्रवारी हा प्रकार घडला.

राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा आरोप आहे. त्यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सीबीआयऐवजी राज्याच्या विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी करणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी फेटाळली.

Anil Deshmukh
शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम ; मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूल केल्याचा आरोप पत्राद्वारे केल्यानंतर १ नोव्हेंबर रोजी ईडीने त्यांना अटक केली होती.

आता अनिल देशमुख आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा ताबा सीबीआयला (CBI) देण्यात आला आहे. यासोबतच कुंदन शिंदे यांचाही ताबा CBI घेणार आहे. न्या. संजय किशन कौल यांच्या न्यायपीठाने मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध राज्य सरकारने केलेले हे अपील फेटाळताना राज्य सरकारचे सर्व युक्तिवाद फेटाळले.

Anil Deshmukh
पहाटेचा शपथविधी चालतो, गडकरींसोबत जेवण केलं, तर तुम्हाला मळमळ होते ? मनसेचा सवाल

बेकायदा आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपावरून सध्या अनिल देशमुख यांच्यासह संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे हे तुरुंगात आहेत. देशमुख यांची चौकशी सीबीआय करत आहे. ही चौकशी सीबीआयकडून राज्याच्या विशेष तपास पथकाकडे (SIT)हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारने याचिकेद्वारे केली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटी वसुली प्रकरणामुळे मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होतं.

देशमुख यांनी सध्या अटकेत असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यामार्फत मुंबईतील बार मालकांकडून ४ कोटी ७० लाखांची खंडणी वसूल केल्याचा देशमुख यांच्यावर आरोप असून हा पैसा नागपूरच्या एका शैक्षणिक संस्थेत वळवल्याचे आरोपांत नमूद आहे. दुसरीकडे पोलिस अधिकारी सचिन वाझे याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com