अनिल देशमुखांना तातडीने रुग्णालयात हलवलं; छातीत दुखू लागल्याने ICU मध्ये उपचार सुरु

Anil Deshmukh | NCP : अनिल देशमुख यांचा रक्तदाब देखील वाढला...
अनिल देशमुखांना तातडीने रुग्णालयात हलवलं; छातीत दुखू लागल्याने ICU मध्ये उपचार सुरु
Anil DeshmukhSarkarnama

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आज तातडीने केईएम (K.E.M Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, छातीत दुखू लागल्याने आणि रक्तदाब देखील प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याने डॉक्टरांनी देशमुख यांना Stress Thallium Heart test करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आहे. यामुळेच सध्या त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

न्यायालयाने अनिल देशमुख यांंना नुकताच झटका देत खासगी रुग्णालयात खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठीची परवानगी त्यांना नाकारली होती. परवानगीसाठी त्यांच्या वतीने न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र अनिल देशमुखांच्या या अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने त्यांना खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता त्यांना जे. जे. रुग्णालयातच उपचार आणि शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच त्यांच्यावर उपचार सुरू असताना देशमुख परीवारातील कोणती व्यक्ती त्यांच्यासोबत थांबेल याचे नाव न्यायालयाने द्यायला सांगितले आहे.

Anil Deshmukh
संभाजीराजे छत्रपती खासदार झाले नाहीत हे दुर्देवी; काँग्रेसचा त्यांना पाठिंबा : नाना पटोले

देशमुख यांना खासगी रुग्णालयात उपचारांची गरज नाही, जेजेतही उपचार होऊ शकतात, असं ईडीनं म्हटलं होतं. तुरुंगात देशमुख यांना खांदेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. जे.जे. रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव असल्याने आणि त्यांचे वाढते वय पाहता खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देशमुखांनी न्यायालयाकडे केली होती.

Anil Deshmukh
सुनिल अण्णांनी भाजपला केलं रिकामं; एकमेव नगरसेविकेचा ४ महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश

मात्र ईडीनं याला विरोध करत देशमुखांवर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचा वैद्यकीय अहवाल कोर्टात सादर केला. तसेच खासगी ऐवजी जे.जे. रुग्णालयातही ही शस्त्रक्रिया होऊ शकते, असाही ईडीनं दावा केला होता. मात्र इडीच्या अहवालाच्या आधआरे न्यायालयाने त्यांना जे.जे. रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्यास कोर्टानं परवानगी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in