मलिक, देशमुखांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी लागली कामाला..

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करीत आहे.
Anil Deshmukh, Nawab Malik
Anil Deshmukh, Nawab Maliksarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha election) येत्या १० जून रोजी होत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या कारागृहात आहेत. त्यांना मतदानासाठी कारागृहाच्या बाहेर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहे.

राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. अजित पवार म्हणाले, "मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. न्यायालयात जात आहोत. मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यासंबंधाची परवानगी न्यायालयाकडे मागणार आहोत. यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत.

२०१७ मध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळेस छगन भूजबळ, आणि रमेश कदम हे विधानभवनात मतदानासाठी आले होते. त्यावेळी ते कारागृहात होते. या दोघांनाही न्यायालयाने विशेष परवानगी दिली होती. अशीच परवानगी आता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मिळेल का, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस कामाला लागली आहे.

साडेतीन हजार कोटी महसूल सोडून दिला

मार्च २०२२ पर्यंत राज्य सरकारकडे येणारी जीएसटीची रक्कम ही २९ हजार ६४७ कोटी रुपये होती. त्यापैकी १४ हजार १४५ कोटी एवढी रक्कम राज्य सरकारला मिळाली. अद्याप आपल्याकडे येणारी रक्कम १५ हजार ५०२ कोटी रुपये आहे. २०२१-२२ मधील ८ हजार ३ कोटी रुपये बाकी आहेत. ही रक्कम देखील लवकर मिळावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातील. याचा फायदा अर्थसंकल्पातील उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी आणि विविध विकासकामांसाठी होईल, असे सांगतानाच पेट्रोल-डिझेल आणि गॅसवरील कर कमी करुन राज्यसरकारने साडेतीन हजार कोटी महसूल सोडून दिला आहे. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने होत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे अजित पवार म्हणाले.

Anil Deshmukh, Nawab Malik
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंची बदनामी करणारा मनसेचा कार्यकर्ता ताब्यात

सध्या कुठले प्रश्न महत्त्वाचे आहे.

आजच महाराष्ट्रात नामांतर होते आहे का ? राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत. औरंगाबादचे नामकरण असेल किंवा उस्मानाबाद यांच्याही नामांतराचा प्रश्न सुरु आहे. लोकशाहीत सर्वांना मागणी करण्याचा अधिकार आहे. या जशा मागण्या करणार्‍याला महत्त्वाच्या वाटतात. त्या सगळ्या वंदनीय,महनीय व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु सध्या कुठले प्रश्न महत्त्वाचे आहे. हाही महत्त्वाचा प्रश्न आहे,असेही अजित पवार म्हणाले.

किती जाती आहेत हे कळू द्या.

सध्या ओबीसींचा प्रश्न आहे. त्यांना प्रतिनिधीत्व मिळायला हवे.जातीनिहाय जनगणना ही चर्चा होते आहे. देशामध्ये नेमक्या किती जाती आहेत हे कळू द्या. म्हणजे जातींचा हा विषय थांबेल. राज्याची साडेबारा कोटी लोकसंख्या आहे. मात्र जातींबाबत जी ओरड लोकं करतात त्यांच्या आकडेवारीनुसार बेरीज केली तर ४० कोटींच्यावर जाते मात्र तेवढी संख्या नाही. त्यामुळे जातीनिहाय जनगणना झाली तर किती जाती आहेत हे स्पष्ट होईल असेही अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com