अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले ; जे जे रूग्णालयात दाखल!

Anil Deshmukh : छातीमध्ये दुखत असल्याने, त्यांना आता जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने या संबधी वृत्त दिले आहे. अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. छातीमध्ये दुखत असल्याने, त्यांना आता जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Anil Deshmukh
नव्या राजकीय समीकरणाची नांदी : शिवसेना - संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा

ई़डीने केलेल्या कारवाई नंतर अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आले होते. सकाळी ११ च्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. तेथील डॉक्टरांकडून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर जे जे रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आता दोन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे समजते. सध्या त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरु असून, डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना ठेवण्यात आलं आहे.

Anil Deshmukh
'सामना'तील टीका भाजपच्या जिव्हारी; मुनगंटीवार म्हणाले, हे वृत्तपत्र नसून...

अनिल देशमुख यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारचे आरोप आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांच्यामार्फत महिन्याला १०० कोटी रूपये खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणात गुन्हा दाखल करून, सीबीआय चौकशी झाली. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.

ईडीच्या आरोपानुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार चालू ठेवण्यासाठी मुंबईतील बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांच्याकडे सुपूर्द केली. तपासात असे समोर आले आहे की, हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीमधील सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, या दोघांवर बनावट कंपन्या चालवण्याचा आरोप आहे. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in