Anil Deshmukh :.. तर अनिल देशमुख तेरा महिने तेरा दिवसांनी बाहेर येतील.. !

Anil Deshmukh : सीबीआयच्या प्रकरणात आज अनिल देशमुख यांच्यावर महत्वाची सुनावणी होणार आहे.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

Anil Deshmukh : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज (सोमवारी) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपये वसुलीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यांना अद्याप ही जामीन मिळालेला नाही. अनिल देशमुख यांना ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहे. काही दिवसापूर्वी मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे.

विशेष न्यायालयाने ऋषिकेश देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कोर्टात हजर राहावे, अशी अट घातली होती. त्यामुळे ऋषिकेश देशमुख कोर्टात हजर होते. कोर्टाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर कोर्टाने ऋषिकेश देशमुख यांना समन्स बजावला होता.

Anil Deshmukh
MCD Elections : केजरीवालांच्या दणक्यानंतर भाजपच्या बड्या नेत्याचा राजीनामा

सीबीआयच्या प्रकरणात आज अनिल देशमुख यांच्यावर महत्वाची सुनावणी होणार आहे. आज जर देशमुखांना जामीन मिळाला तर देशमुख तेरा महिने तेरा दिवसांनी बाहेर येतील. या प्रकरणात सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार झाला आहे. देशमुखांना ईडीच्या तपासात जामीन मिळाला आहे. आता त्यांना सीबीआय प्रकरणात जामीन मिळेल की नाही, हे दुपारी समजेल.

अनिल देशमुख यांच्यावर अशी झाली कारवाई

  • मार्च २०२१ - परमबीर सिंह यांचे १०० कोटी वसुलीबाबतचे पत्र

  • ५ एप्रिल रोजी अनिल देशमुख यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

  • १४ एप्रिल रोजी अनिल देशमुख सीबीआय चौकशीला हजर, ९ तास झाली होती चौकशी

  • ५ जून रोजी हजर राहण्याचे पहिले समन्स

  • २५ जून रोजी देशमुखांच्या नागपूर व मुंबईतील घरावर छापे

  • २६ जून रोजी देशमुखा़ंना दुसरे समन्स

  • ५ जुलै रोजी हजर राहण्याबाबत तिसरे समन्स

  • १६ जुलै रोजी देशमुखांची ४ कोटीची संपती जप्त केली (जप्तीमध्ये वरळीतील घर व उरणच्या धुतुम गावातील जमीनीचा समावेश)

  • १८ जुलै रोजी अनिल देशमुखांच्या नागपूरच्या काटोल येथील घरावर ईडीचे छापे

  • ३० जुलै अनिल देशमुखने ईडी विरोधात सुप्रिम कोर्टात धाव घेतली

  • १६ आँगस्ट अनिल देशमुखाची याचिता सुप्रिमकोर्टाने फेटाळली

  • १८ आँगस्ट रोजी अनिल देशमुख यांना चौथं समन्स, आँगस्ट महिन्यातच ५वे समन्स बजावले

  • २ सप्टेंबर रोजी सीबीआयचा अनिल देशमुखांचा अहवाल झाला लिक

  • देशमुख चौकशीला हजर राहत नसल्यामुळे ५ सप्टेंबर रोजी ईडीची लूक ऑऊट नोटीस

  • ३० आँक्टोंबर मुंबई उच्च न्यायालयाने ईडी विरोधात अनिल देशमुखाची याचिका फेटळली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com