राज्यसभा निवडणूकीसाठी अनिल देशमुख, नवाब मलिक यांना परवानगी मिळणार का?

Rajya Sabha Elelction latest news |2017 मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी त्यावेळी तुरुंगात असलेले छगन भुजबळ आणि रमेश कदम यांनाही मतदानाची परवानगी मिळाली होती.
राज्यसभा निवडणूकीसाठी अनिल देशमुख, नवाब मलिक यांना परवानगी मिळणार का?
Anil Deshmukh |Nawab MalikSarkarnama

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीचे दोन मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) तुरुंगात आहेत. त्यातच येत्या 10 जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. सर्व राजकीय पक्षांनी त्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभुमीवर मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू झाले आहेत. (Rajya Sabha Elelction latest news update)

राज्यसभेच्या मतदानासाठी परवानगी मिळावी, यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 8 जून रोजी या अर्जावर सुनावणी होणार असून न्यायालयाने उद्यापर्यंत (7 जून) ईडीला यासंदर्भात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीने वेळ मागितला आहे. त्यामुळे न्यायालय अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Anil Deshmukh |Nawab Malik
राज्यसभा निवडणुकीची धामधुम : कोरोना रुग्णांची वाढ, मतदानाचं काय होणार?

दरम्यान 2017 मध्ये, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि रमेश कदम यांनीदेखील मुंबई न्यायालयात जाऊन राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्याची परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. मनी लाँड्रिंग प्रकरणात भुजबळ यांच्यावर खटला सुरु होता. तर रमेळ कदम यांच्यावरही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे सरकारी पैसे बुडवल्याचा आरोप होता.

न्यायालयाने भुजबळांची मागणी मान्य करत त्यांना मतदानासाठी परवानगी दिली, तर, मुंबई उच्च न्यायालयानेही रमेश कदम यांना मतदान करण्याची परवानगी दिली होती. या दोघांनाही मतदानाच्या दिवशी विधानसभेत नेण्यात आले जेथे त्यांनी मतदान केले आणि मतदानानंतर दोघांनाही पुन्हा कारागृहात नेण्यात आले. त्यामुळे याच पद्धतीने नवा मलिक आणि अनिल देशमुख यांनाही परवानगी मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in