कीर्तिकर शिंदे गटात जाताच देसाईंना लागली लॉटरी; ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

Anil Desai News : शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी अनिल देसाई यांची नियुक्ती
Uddhav Thackeray, Anil Desai
Uddhav Thackeray, Anil DesaiSarkarnama

Anil Desai News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) पक्षाचे नेते खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात गेल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष पद शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गजानन कीर्तिकर शिंदे गटात गेल्यानंतर स्थानीय लोकाधिकार समितीचा नेमके काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, कीर्तिकर शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांची हकालपट्टी केल्याचे पत्रक दोन दिवसांपूर्वी काढून तातडीने आता स्थानीय लोक अधिकार समितीचे अध्यक्ष पद खासदार देसाई यांना देण्यात आला आहे.

Uddhav Thackeray, Anil Desai
'50 खोके' दुखवताहेत डोके? बंडखोर आमदारांमध्ये वाढतेयं अस्वस्थता...

कीर्तिकरांच्या पक्षांतरानंतर त्यांचे रिक्त पद मिळवण्यासाठी ठाकरे गटात चुरस निर्माण झाली होती. त्यामध्ये राज्यसभा खासदार देसाई यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. ते स्थानिय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस होते. तसेच अनेक वर्षांपासून ते स्थानिय लोकाधिकार समितीत काम करतात. शिवाय ठाकरे कुटुंबाशी ते निष्ठावाण आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती या पदावर झाली आहे.

शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना आहे. दहा हजारांहून अधिक सदस्य या संघटनेचे आहेत. लोकाधिकार समिती मुंबई आणि महाराष्ट्रात स्थित विमा, तेल, विमान वाहतूक, रेल्वे, संशोधन, केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांच्या कार्यालयांमध्ये सक्रिय आहे.

Uddhav Thackeray, Anil Desai
काल कुस्ती, आज दोस्ती; आव्हाड असे काय बोलले की मुख्यमंत्री शिंदेंनी स्टेजवरच मारली टपली

राज्यातील 80 टक्के नोकऱ्यांमध्ये मराठी भाषिकांना प्राधान्य मिळावे, यासाठी ही समिती काम करते. लोकाधिकार समितीचे काम खासदार गजानन कीर्तिकर यांच्याकडे होते. त्या ठिकाणी आता राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com