केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महिन्यातून एक वेळा रुटीन चेकअपसाठी लीलावती रुग्णालयामध्ये येत असतात.
Narayan Rane News in Marathi, BJP News
Narayan Rane News in Marathi, BJP NewsSarkarnama

मुंबई : थोडासा थकवा जाणवू लागल्याने केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना आज (ता. २७ मे) मुंबईतील (Mumbai) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अर्ध्या तासापूर्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राणे यांची प्रकृती आता स्थिर आहे, असे डॉ. जलील पारकर यांनी सांगितले. (Angioplasty surgery on Union Minister Narayan Rane)

Narayan Rane News in Marathi, BJP News
आम्ही तुमच्यासोबत पण दबाव आहे! संभाजीराजेंना होता सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महिन्यातून एक वेळा रुटीन चेकअपसाठी लीलावती रुग्णालयामध्ये येत असतात. नेहमीप्रमाणे ते आजही वैद्यकीय तपासणीसाठी लीलावतीमध्ये आले होते. मात्र, आज लीलावतीमध्ये येत असताना त्यांना थोडासा त्रास जाणवत होता. नेहमीप्रमाणे त्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याची आवश्यकता डॉक्टरांना वाटली. डॉ. जलील पारकर यांच्या सल्ल्यानंतर आज त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. (Narayan Rane News in Marathi)

Narayan Rane News in Marathi, BJP News
भाजपशासित मध्य प्रदेशात दारु स्वस्त! करात कपातीचा मोठा निर्णय

केंद्रीय मंत्री राणे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेदरम्यान ब्लॉकेजेस हटवण्यासाठी दोन स्टेन बसविण्यात आले आहेत. त्यांची तब्येत पाहून येत्या दोन-तीन दिवसांत राणे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. राणे यांना विश्रांतीसाठी दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येऊ शकते, असे रुग्णालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com