Andheri Election : पोटनिवडणुकीसाठी आज मतदान : ऋतुजा लटकेंसह सात उमेदवार रिंगणात!

Andheri Election : 333 कंट्रोल युनीट, 333 बॅलेट युनीट व 359 व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर
Andheri Election
Andheri Election Sarkarnama

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज (3 नोव्हेंबर 2022) मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रशासकीय तयारी करण्यार आलेली आहे. मतदारसंघातील नागरिकांनी वेळेत आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडावे, यासाठी प्रशासनाने आवाहन, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकीरी निधी चौधरी यांनी केले.

मतदारसंघातील एकूण मतदार :

पुरुष मतदारांची संख्या : 1 लाख 46 हजार 685

महिला मतदारांची संख्या : 1 लाख 24 हजार 816

तृतीय पंथी मतदारांची संख्या : 1

एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 71 हजार 502

या निवडणूकीत 80 वर्षांपेक्षा पेक्षा अधिक वय असणाऱ्या मतदारांना 430 मतदारांना घरातूनच मतदान करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यापैकी 392 मतदारांना मतदान घरुन मतदान करता यावे, यासाठीची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी.

मतदान केंद्रांची संख्या :

मतदान केंद्रांची संख्याची 256 आहे, ही 38 ठिकाणी कार्यन्वित राहणार आहे.

1 हजार पेक्षा अधिक मतदार संख्या असणारी मतदान केंद्रांची संख्या 163 आहे तर

1 हजार 250 पेक्षा अधिक मतदार संख्या असणारी मतदान केंद्रे एकूण 44 आहेत.

239 मतदान केंद्रे ही तळ मजल्यावर आहेत. तर 17 मतदान केंद्रे पहिल्या मजल्यावर आहेत. पहिल्या मजल्यावरच्या मतदान केंद्रासाठी उद्वाहन म्हणजेच लिफ्टची सोय असेल. व्हिल चेअरची व्यवस्था ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Andheri Election
उद्धव ठाकरेंच ठरलं; खासदार जाधव अन् भावना गवळींच्या मतदारसंघात धडकणार!

सखी मतदान केंद्र :

या निवडणूकीतील विशेष गोष्ट म्हणजे, आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे अंधेरी पूर्व मधील मरोळ एज्यूकेशन अकादमी हायस्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक ५३ इथे 'सखी मतदान केंद्र' उभारण्यात आले आहे. या मतदान केंद्रात एकूण १ हजार ४१८ मतदारांपैकी, ७२६ महिला; तर ६९२ पुरुष मतदार आहेत. या केंद्रात महिला मतदारांची संख्या लक्षात घेता, हे केंद्राची 'सखी मतदान केंद्राची' म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या मतदान केंद्रात अधिकारी व कर्मचारी फक्त महिला राहणार आहेत.

इव्हीएम व व्हीव्हीपॅट इत्यादी यंत्र तपशील :

मतदानासाठी 333 कंट्रोल युनीट, 333 बॅलेट युनीट व 359 व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे.

या पोटनिवडणूकीत एकूण 07 उमेदवार रिंगणात आहेत :

१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके - (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२. श्री. बाला व्यंकटेश विनायक नाडार - (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)

३. श्री. मनोज नायक - (राईट टू रिकॉल पार्टी)

४. श्रीमती नीना खेडेकर - (अपक्ष)

५. श्रीमती फरहाना सिराज सय्यद - (अपक्ष)

६. श्री. मिलिंद कांबळे - (अपक्ष)

७. श्री. राजेश त्रिपाठी - (अपक्ष)

केंद्रीय निरीक्षक :

या निवडणूकीच्या प्रक्रियासाठी एकूण तीन केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती निवडणूक आयोगाने केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी देवेश देवल, भारतीय पोलिस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी प्रवीण कोया आणि भारतीय राजस्व सेवेतील ज्येष्ठ अधिकारी सत्यजीत मंडल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ७० ज्येष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचीहूी सूक्ष्म स्तरीय निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहेत.

मतदान प्रक्रीया सुरळीत पार पडावी यासाठी सुमारे १ हजार ६०० कर्मचारी तैनात करण्यात आलेली आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे.

Andheri Election
अमृता फडणवीसांनी वाय प्लस सुरक्षा स्वीकारली पण व्हॅन नाकारली

कायदा व सुव्यवस्था :

या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठीही सुमारे १ हजार १०० इतके अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये पोलिस दल, राखीव पोलिस दल, निमलष्करी दल, गृह रक्षक दल इत्यादीचा समावेश आहे.

99.96 टक्के मतदारांकडे एपिक कार्ड : मतदानादरम्यान मतदारांची ओळख निश्चित करण्यासाठी एपिक कार्ड (EPIC) कार्ड हा महत्त्वपूर्ण आहे. या मतदारसंघातील २ लाख ७१ हजार ५०२ मतदार आहेत तर यापैकी तब्बल २ लाख ७१ हजार ३९५ मतदारांकडे एपिक कार्ड आहे. म्हणजेच ९९.९६ टक्के मतदारांकडे EPIC कार्ड उपलब्ध आहे.

सार्वजनिक सुट्टी :

आज मतदानाच्या दिवशी या मतदारासंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जे मतदार कामासाठी व शिक्षणासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर कार्यरत असतील, त्यांनाही ही सुट्टी लागू करण्यात आली आहे. केंद्र शासनाची शासन कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना आस्थापनांना ही सुट्टी लागू राहील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com