Andheri Election : नोटाला मिळालेली मते ही भाजपची ; ऋतुजा लटकेंचा दावा!

Andheri Election : लवकरच मातोश्रीवर जाऊन मी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.
Rutuja latake
Rutuja latake Sarkarnama

मुंबई : अंधेरी पूर्व (Andheri पोटनिवडणुकीत (BY Election) शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke) यांनी अपेक्षेप्रमाणे मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. मात्र, नोटाला मिळालेली लक्षणीय मते पाहता, याचीही चर्चा होत आहे. मतमोजणीच्या सोळाव्या फेरीअखेर लटके यांना तब्बल 58758 मते मिळाली आहेत, तर दुसऱ्या क्रमांकाची 11570 मते नोटाला मिळाली आहेत. आणखी तीन फेऱ्यांची मतमोजणी होणे बाकी आहेत.

Rutuja latake
Andheri Election Result : रमेश लटके यांचे अपुर्ण काम पुर्ण करणार : ऋतुजा लटके

विजय संपादित केल्यावर लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला. विजय जवळपास निश्चित झाल्यानंतर ऋतुजा लटके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या यांनी मला संधी दिली.

लवकरच मातोश्रीवर जाऊन मी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. हा माझा नव्हे तर रमेश लटके यांचा विजय आहे. अंधेरीचा विकास हे त्यांचं ध्येय होते. ते ध्येय मी पुर्ण करणार, असा विश्वासही लटके यांनी यावेळी व्यक्त केला.

Rutuja latake
ऋतुजा लटकेंची मोठ्या विजयाकडे वाटचाल : बाराव्या फेरीअखेर ४५ हजार मते, तर नोटाला ८८८७ मते

लोकांची मला साथ आहे. माझे कुटूंब माझ्या सोबत होतं म्हणून मी आज इथे आहे. माझ्या पतीच्या पुण्याईमुळे आज मी विजयी झाले. मला पाठिंबा दिलेल्या सर्वांचे मी आभार मानते, आतापर्यंतचा निकाल पाहता ९० टक्के लोकांनी मला साथ दिली. पण ज्यांनी नोटाला मतदान केले ते सर्व भाजपचे मतदान आहे. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com