Ramesh Latke| शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

MLA Ramesh Latke passed away | शिवसेना पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्याकडून तीव्र शब्दात शोक व्यक्त
Ramesh Latke Latest News, Ramesh Latke passed away
Ramesh Latke Latest News, Ramesh Latke passed away Sarkarnama

(MLA Ramesh Latke passed away)

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना (Shivsena) आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे काल सायंकाळी निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. आमदार लटके दुबईत कुटुंबियांसह फिरायला गेले असतानाच काल त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार रमेश लटके हे शिवसेनेचे सलग दोन वेळचे आमदार होते. (Ramesh Latke Death news)

दांडगा लोकसंपर्क आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील एक उमदं नेतृत्व म्हणून आमदार लटके यांना ओळखलं जात होतं. दरम्यान त्यांच्या निधनाची माहिती शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कळवली आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून. त्यांचे पार्थिव लवकरच मुंबईत आणलं जाणार आहे. (Ramesh Latke latest news)

आमदार रमेश लटके यांची राजकीय कारकीर्द गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून झाली. तिथे केलेल्या त्यांच्या सामाजिक कामाची चर्चा मातोश्री पर्यंत पोहचली आणि १९९७ साली त्यांना मुंबई पालिकेचे तिकीट मिळाले. तेव्हा ते विजयी होवून पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतरच्या २००२, २००७ या निवडणुकांमध्येही लटके यांनी विजय मिळवत महापालिका सभागृहात काम केले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत लटके यांच्या कामाची दखल घेत त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले. भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा पराभव करून रमेश लटके यांनी आमदार म्हणून विधानसभेत पहिल्यांदा प्रवेश केला. त्यानंतर पुढच्याच २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा तब्बल १६ हजार ९६५ मतांनी पराभव केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com