Andheri By Election| मुरजी पटेल उमेदवारी अर्ज मागे घेणार?

Andheri By Election| अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर आहे.
 Rutuja Latke, Murji Patel
Rutuja Latke, Murji Patelsarkarnama

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकांच्या हालचालीना वेग आला आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहील्यानंतर आज भाजपचे उमेदवार मुरजी पटेल आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला तर अंधेरीची ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. त्यासाठी आज भाजप नेते आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर आहे.

मुंबईसह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणूक क्षेत्रात मतदानाच्या दिवशी ३ नोव्हेंबर रोजी होईल. अंधेरी पूर्वमधून राष्ट्रीय पक्षांचे दोन उमेदवार, नोंदणीकृत पक्षांचे तीन तर इतर पक्षांचे नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याबाबत केंद्रीय सचिव आणि महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहितीही समोर आली आहे.

 Rutuja Latke, Murji Patel
Manish Sisodiya : आईचा आशीर्वाद घेऊन सिसोदिया CBI कार्यालयात हजर ; अटकेसाठी तयार

अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १७ ऑक्टोबर आहे. राज ठाकरेंच्या पत्रानंतर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पत्रकार परिषदेतून भाजपकडे ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पत्राद्वारे भावनिक आवाहन केले होते. त्यानंतर आज सकाळपासून भाजप नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठकांना वेग आला आहे. त्यामुळे मुरजी पटेल आज त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे, शरद पवार आणि प्रताप सरनाईक यांच्या भावनिक आवाहन केलं आहे. तसेच, ऋतुजा लटके यांचा कार्यकाळ फक्त दिड वर्षांसाठी असणार आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्याच पत्नीला ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणे हीच रमेश लटके यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल, असे आवाहन भाजला करण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान मुरजी पटेल यांनी अर्ज मागं घेतला तरी ऋतुजा लटके यांच्यापुढं इतर उमेदवारांचं आव्हान नक्की असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com