Andheri by Election : प्रशासनाने लावले 'हे' निर्बंध

Andheri by Election | शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे.
 Rutuja Latke, Murji Patel
Rutuja Latke, Murji Patelsarkarnama

Andheri by Election मुंबई : शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंधेरीत जाहीर प्रचारासह काही निर्बंध लागू करण्यात येत आहेत, अशी माहिती अंधेरी पूर्व मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे. या निर्बंधाचे आणि सुचनांचे पालन करण्याचे आवाहनही प्रशांत पाटील यांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील '१६६ अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर पासून सायंकाळी ६ वाजल्यापासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू करण्यात येत आहे. या पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार असून निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत.

 Rutuja Latke, Murji Patel
अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर: तीन नोव्हेंबरला मतदान

यासोबतच, अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी 'अंधेरी पूर्व' मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन चौधरी यांनी केले आहे.

असे आहेत निर्बंध

- ४८ तासांच्या कालावधीत उमेदवारांना त्यांच्या प्रचार व प्रसार साहित्यासाठी, तसेच जाहिरातीसाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयाशी किंवा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि विहित निर्देशांनुसार कार्यवाही करुन पूर्वपरवानगी प्राप्त करून घ्यावी.

- निर्बंध कालावधी दरम्यान मद्यविक्री दुकाने व तत्सम बाबीं येथील व्यवहार, खरेदी-विक्री, देवाणघेवाण इत्यादींवर पूर्णतः निर्बंध असतील

- शासकीय आणि सार्वजनिक उपक्रमांच्या विश्रामगृहांमध्ये 'झेड' दर्जाची सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या राजकीय व्यक्तींना नियम व पद्धतींच्या अधीन राहून निवास करता येईल.

- धार्मिक स्थळांचा राजकीय वापर करता येणार नाही

- आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग करणाऱ्या कोणत्याही माहितीचे आदान-प्रदान करण्यास किंवा पाठवता येणार नाहीत.

 Rutuja Latke, Murji Patel
Saffron Project : महाराष्ट्रात चाललयं तरी काय ? : आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेला !

- 'बल्क' पद्धतीने पाठवण्यात येणाऱ्या लघु संदेशांवर (एस.एम.एस.) निर्बंध

-ध्वनीक्षेपकांच्या वापरावर निर्बंध

- कोणत्याही प्रकारची सभा, जाहीर सभा घेण्यास आणि मिरवणूक काढता येणार नाही

- मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या परिसरात उमेदवारांचे तात्पुरते कार्यालय, संपर्क ठिकाण उभारता येणार नाहीत

- ओपिनियन पोल, सर्वेक्षण इत्यादी बाबी करण्यावर निर्बंध

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com