Balasaheb Thackeray : ...अन् शिवसैनिकांना झाली बाळासाहेबांच्या 'त्या' ऐतिहासिक भाषणाची आठवण

Uddhav Thackeray : कलानगर येथे उद्धव ठाकरेंचे ओपनजीपमधून मार्गदर्शन
Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama

Shivsainik Memories Balasaheb : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार शिवसेना हा मूळ पक्ष आणि त्याचे अधिकृत असलेले धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे यापुढे ठाकरेंशिवाय शिवसेना असेच चित्र असणार आहे. हा उध्दव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. त्यातूनही ठाकरे यांनी मी खचलो नाही, तुम्हीही खचू नका, असे आवाहन शिवसैनिकांना केले.

त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यानंतर त्यांनी कलानगर चौकात ओपनजीपमधून शिवसैनिकांना संबोधित केले. या चित्राने बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या ६ फेब्रुवारी १९६९ रोजीच्या भाषणाची आठवण झाली.

Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : मातोश्रीबाहेर लोटला जनसागर; उद्धव ठाकरेंचे शक्तीप्रदर्शन

दिवस होता ६ फेब्रुवारी १९६९ रोजीचा. त्यावेळचे उपपंतप्रधान मोरारजी देसाई (Moraraji Desai) मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येणार होते. दरम्यान शिवसेनेने बेळगाव सीमाप्रश्नासाठीचा लढा तीव्र केला होता. शासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत मोरारजींना मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही अशी भूमिका सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती. मात्र देसाईंनी याकडे दुर्लक्ष केले होते. मोरारजी देसाई मुंबईला आले.

Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : निवडणुकांच्या तयारीला लागा... उद्धव ठाकरेंचे फुंकले रणशिंग

शिवसैनिकांनी माहीम कॉजवे येथे त्यांची गाडी अडवली. त्यावेळी देसाई यांच्या चालकाने त्यांच्या सुरक्षेच्या विचार केला. देसाई यांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने गाडी थेट जमावावर घातली. यात काही काही शिवसैनिक गंभीररित्या जखमी झाले होते. त्या प्रकारामुळे शिवसैनिक आणि बाळासाहेबही संतप्त झाले. त्यावेळी त्याच गाडीच्या बोनेटवर उभे राहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले होते.

Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
Solapur Shivsena News : ‘एक वडा, दोन पाव; निवडणूक आयोग XXX’ : निवडणूक आयोगाविरोधात शिवसैनिक आक्रमक

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ओपनजीपमध्ये उभे राहून मार्गदर्शन केले. ते म्हणाले होते की, पक्षाचे नाव गेले आणि चिन्ह गेले म्हणजे शिवसेना संपली असे कुणीही समजू नये. ज्यांनी आधी माझे वडील चोरले. मात्र चोर तो चोरच असतो. तसेच तुम्ही धनुष्यबाण घेऊन या आम्ही मशाल घेऊन येतो, असे म्हणत निवडणुकीचे आव्हान त्यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com