Sharad Pawar Resign: अजित पवार येताच कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या नावाने घोषणाबाजी....

Maharashtra Politics| शरद पवारांच्या राजीनाम्याच्या प्रस्वावासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या १६ सदस्यांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
 Sharad Pawar Resign | Ajit Pawar
Sharad Pawar Resign | Ajit Pawar Sarkarnama

Sharad Pawar Resign Latest news Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्याच्या प्रस्वावासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या १६ सदस्यांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यासाठी राष्ट्रवादीचे नेते मुंबईतील प्रदेश कार्यालयात पोहचत आहेत.अशातच एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) प्रदेश कार्यालयात पोहचले असता कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. पण अजित पवार यांची गाडी तिथे पोहचताच कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी सुरु केली. माध्यमांनी अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण एकही शब्द न बोलता अजित पवार कार्यालयात निघून गेले.

 Sharad Pawar Resign | Ajit Pawar
NCP New President : अध्यक्षपदी तुम्हीच राहा ! ; शरद पवारांना देशभरातून ज्येष्ठ नेत्यांचे फोन, आजच्या निर्णयाकडे लक्ष..

दरम्यान, शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी एकच गोंधळ केला. जवळपास दोन तासाहून अधिक वेळ सर्व नेते कार्यकर्ते त्यांची मनधरणी करत होते. पण शरद पवार यांच्या प्रकृती आणि वय या कारणास्तव त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव आपण मान्य केला पाहिजे, अशी भूमिका मांडली. पण तरीही नेते, कार्यकर्ते त्यांच्या राजीनाम्याच्या विरोधात ठाम होते. यामुळे अजित पवार यांच्या विरोधात कार्यकर्त्यामध्ये एक नाराजीचा सूर असल्याचे दिसते. (Sharad Pawar resign Latest News)

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला नाही तर आम्हीही राजीनामे देऊ, अशी आक्रमक भूमिका नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मांडली. त्यानंतर नव्या अध्यक्षासाठी जी १६ सदस्यांची समिती नेमली आहे. ती समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. आज या समितीची मुंबईच्या प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार खासदार प्रफुल्ल पटेल शरद पवार राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव मांडणार आहेत.

 Sharad Pawar Resign | Ajit Pawar
Sharad Pawar Resign : पवारांनी निर्णय बदलला नाही तर पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा

दरम्यान, शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राज्यातून नव्हे तर देशभरातील नेते त्यांना अध्यक्षपदी राहण्याची विनंती करत आहेत. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, माकपचे नेते सीताराम , आम आदमी पार्टीचे संजय सिंग,सीपीआयचे डी. राजा यांंनीही शरद पवार यांना फोन करत त्यांना अध्यक्षपद न सोडण्याची विनंती केली आहे.

राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट करण्यासाठी शरद पवार हेच नाव अग्रणी असल्यामुळे त्यांनी राजीनाम्याचा विचार मागे घ्यावा, असं विरोधी पक्षांचे मत आहे. त्यामुळे आता शरद पवार आता काय निर्णय घेणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com