“हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची…” : आनंद दिघेंनी राज ठाकरेंना दिलेल्या 'त्या' संदेशाची चर्चा

Anand Dighe| Raj Thackeray| धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाच्या शुक्रवारी (१३ मे) राज्यातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.
“हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची…” : आनंद दिघेंनी राज ठाकरेंना दिलेल्या 'त्या' संदेशाची चर्चा
Anand Dighe| Raj Thackeray|

Anand Dighe and raj thackeray last meet

मुंबई : ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाच्या शुक्रवारी (१३ मे) राज्यातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातील एक सीन सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Anand Dighe| Raj Thackeray|
उद्धव ठाकरेंची सभेत टोमणे की फटके? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा एक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मनसे रीपोर्ट या ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करण्यात आला आहे. यात आनंद दिघे हे रुग्णालयात असल्याचे दिसत असून राज ठाकरे त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. हाच फोटो शेअर करत “हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची आहे- धर्मवीर. धर्मवीर आनंद दिघे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्यातील हॉस्पिटल मधील शेवटचा संवाद”, असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.

तर आनंद दिघे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचाही एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोघांमधील संपूर्ण संवाद दाखवण्यात आला आहे. काल या चित्रपटाचा खास शो ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल, लेझीम पथकाच्या तालात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. खास बाब म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांच्या पोस्टरसमोर विधिवत पूजा आणि दुग्धाभिषेकही करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in