निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात संस्था स्थापन होणार !

Niti Aayog : सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी निती आयोगाने राज्याला सहकार्य करावे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

मुंबई : निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था (State Government) स्थापन करण्यात येणार आहे. कृषी,आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण या विषयावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी ही संस्था काम करील, असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज व्यक्त केले.

Eknath Shinde
भाई का बर्थडे भाईला पडला महागात; पोलिसांनी घेतल ताब्यात...

सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी निती आयोगाने राज्याला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. देशाच्या पाच लाख कोटींच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचा एक लाख कोटी रूपयांच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा वाटा असेल, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde
धक्कादायक : पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत शेतकऱ्याची आत्महत्या

निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांच्यासह आयोगातील तज्ञांनी आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव बैठकीला उपस्थित होते.

निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या समवेतच्या तज्ञांनी महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील परिवर्तनासाठी आयोगामार्फत राज्याला कशाप्रकारे सहकार्य करण्यात येणार आहे, याविषयी सादरीकरण केले. मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, ‘‘ राज्यासाठी निती आयोगाच्या धर्तीवर स्थापन होणाऱ्या राज्यस्तरीय संस्थेच्या माध्यमातून राज्याचा सर्वागिण विकास आणि सामान्यांना शासनाकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती यांची सांगड घालण्यात यावी. त्यासाठी निती आयोगाच्या अनुभवाचा फायदा राज्याला मिळेल.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com