Maharashtra Budget 2023 : विधिमंडळात जयंत पाटलांनी धनंजय मुंडेंच्या गालाला हात लावला; काय होतं कारण...

Jayant Patil and Dhananjay Munde : सभागृहातील या अनोख्या प्रसंगाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
Jayant Patil and Dhananjay Munde
Jayant Patil and Dhananjay Munde Sarkarnama

NCP News : राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप होतात. अनेकवेळा सत्ताधारी आणि विरोधकही आमनेसामनेही येतात. मात्र, आज सभागृहात एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा भर सभागृहामध्ये ताप चेक केला. विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत असताना त्यांच्या पाठिमागे बसलेले धनंजय मुंडे यांचा ताप जंयत पाटलांनी चेक केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. त्यामुळे सभागृहातील या अनोख्या प्रसंगाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Jayant Patil and Dhananjay Munde
NCP News : होर्डींग राष्ट्रवादीचे, आवाहन सरन्यायाधीशांना; अन् त्यासाठीचे शब्द भाजपाच्या दिवंगत नेत्याचे !

नेमकं काय घडलं?

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार हे विक्रोळी मेट्रोच्या कार डेपोचा प्रश्न अजून सुटलेला नाही, त्यावरून सरकारला प्रश्न विचारत होते. मात्र, याच वेळी अजित पवार यांच्या पाठिमागे धनंजय मुंडे बसलेले होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात काहीसी कुजबूज सुरू असते.

त्यानंतर जंयत पाटील हे धनंजय मुंडे यांच्या गालाला हात लावत त्यांचा ताप चेक करतात. यानंतर पुन्हा जंयत पाटील हे धनंजय मुंडेंना काहीतरी सांगतात. त्यानंतर धनंजय मुंडे हे आपल्या हातातील मास्क तोंडाला लावतात. मात्र, हा क्षण कॅमेऱ्याने अजित पवारांच भाषण सुरू असताना टीपला.

Jayant Patil and Dhananjay Munde
Pune News : सरकारचे उशिराने शहाणपण; हुतात्मा राजगुरू स्मारक आराखडा समितीत अखेर स्थानिकांचा समावेश !

दरम्यान, अजित पवार हे मेट्रोच्या प्रश्नावर बोलत होते. पवार म्हणाले, ''विक्रोळी मेट्रो सहा, या मेट्रोच्या कार डेपोचा प्रश्न अजूनही सुटला नाही. मेट्रो सहासाठी कांजूरमार्गाची जागा कार डेपोसाठी मिळावी, अशी मागणी पुर्वीपासून होती. त्यामुळे मुंबईकरांच हित लक्षात घेऊन आता तरी एमएमआरला कांजूरमार्गची जागा मिळवून द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in