Eknath Shinde : सरकारमधील मंत्र्याचा दोन वेगवेगळ्या दाव्यांमुळे संभ्रमाचे वातावरण : मुख्यंमंत्री नेमके...

Uday Samant : उदय सामंत आणि केसरकर यांचा वेगवेगळा दावा.
Deepak Kesarkar : Uday Samant :  Eknath Shinde :
Deepak Kesarkar : Uday Samant : Eknath Shinde :Sarkarnama

Deepak Kesarkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नुकतंच झालेल्या स्वित्झर्लंडमधील दोवोस येथील दौऱ्याबाबत अनेक चर्चा घडून येत आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना यावरून घेरले होते. मुख्यमंत्र्यांनी दाव्होस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेतून शिंदे यांनी १ लाख ४० हजार कोटींचे गुंतवणूक आणल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र या दौऱ्याबाबत आता दोन वेगवेगळे दावे केले जात आहेत.

एकनाथ शिंदे हे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह दावोसच्या दौऱ्याला गेले होते. मात्र आता उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्याबाबत दोन वेगवेगळे दावे केले आहेत. यामुळे आता संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. दोन मंत्र्यांच्या विपरित दाव्यांमुळे विसंगती दिसून येत आहे.

Deepak Kesarkar : Uday Samant :  Eknath Shinde :
Abdul Sattar News : फडणवीसांसमोर सत्तारांची फटकेबाजी, म्हणाले सगळ्या निवडणुकीत खारीचा वाटा उचलेन..

नेमकं प्रकरण काय?

दीपक केसरकर यांनी आजच्या (दि. २५ जानेवारी) पत्रकार परिषदेतेतून एक दावा केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकूण ७६ तास दाव्होसमध्ये उपस्थित होते. यावेळी ते केवळ चार तासांची झोप घेतली, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, डाव्होस या दौऱ्यात तब्बल ४० कोटी रूपयांचा मोठा खर्च सरकारकडून केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. ठाकरेंच्या या आरोपांवर उत्तर देण्यासाठी दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे.

मात्र याआधी उदय सामंत यांनी दावोस दौऱ्याबाबत माहिती देताना, वेगळा दावा केला होता. सामंत म्हणाले होते की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डाव्होसमध्ये २८ तास उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमके किती वेळ डाव्होसमध्ये उपस्थित होते, याबद्दल आता संभ्रमाचे वातावरण आहे.

Deepak Kesarkar : Uday Samant :  Eknath Shinde :
Sangli News: गोपीचंद पडळकरांच्या बंधूंना झटका, मिरजेतील 'त्या' वादग्रस्त जागेबाबत मोठा निर्णय

उदय सामंत यांनी म्हंटले होते की, “डाव्होसयेथे दोन किलोमीटर भागात जागतिक आर्थिक परिषद आयोजित करणयात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या पॅव्हेलियनमध्ये अनेक देशांचे प्रमुख, तसेच भारतातील वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योजक यांनी भेट दिली होती. मुख्यमंत्री हे डाव्होसमध्ये फक्त २८ तास वास्तव्यास होते. मात्र या २८ तासांच्या कालावधीत ते राज्यासाठी ज्या गतीने कार्य करतात, त्याच्या दोनपट वेगाने ते दाव्होसमध्ये कार्य करत होते.”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com