बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, या मागणीसाठी दादर रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन

सुरुवातीला पोलिसांनी विरोध केला. मात्र, परिस्थिती चिघळू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवत आंदोलनाची परवानगी देण्यात आली.
Dadar Rail Station
Dadar Rail StationSarkarnama

पुणे : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या विविध भागातून आज (ता.6 डिसेंबर) अनुयायांनी चैत्यभूमीवर मोठी गर्दी केली. मात्र, दुसरीकडे भीम आर्मीच्या (Bhim Army) वतीने दादर रेल्वे स्थानकाबाहेर स्थानकाला (Dadar Railway Station) डॅा. बाबासाहेबांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. यामुळे काही काळासाठी पोलिसांची (Mumbai Police) चांगलीच पळापळ झाली.

Dadar Rail Station
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना पेंडॉल काढण्याचे आदेश...

महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी दरवर्षी अनेकजण राज्यातील व देशाच्या विविध भागातून डॅा. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येतात. तेव्हा ते दादर रेल्वे स्थानकामध्येच उतरतात. त्यामुळेच या स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच नाव देण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. आज पुन्हा भीम आर्मीने आंदोलन करून ही मागणी केली आहे.

भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आगोदर स्थानकासमोर आंदोलन केले. त्यानंतर 'नामांतरण झालेच पाहिजे झालेच पाहिजे', व 'जय भीम' च्या घोषणा दिल्या यानंतर कार्यकर्ते स्थानकामध्ये शिरले. यावेळी पोलिसांची चांगलीच पळापळ झाली. सुरुवातीला पोलिसांनी त्यांना विरोध केला. मात्र, परिस्थिती चिघळू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवत आंदोलकांना स्थानकावरील ब्रिजवरुन घोषणाबाजी करत चालत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. आंदोलकांनी पोलीस बंदोबस्तामध्येच हातात नामांतराच्या मागणीचे पोस्टर्स घेऊन घोषणाबाजी केली. दादर रेल्वे स्थानकाच्या नामकरणासाठी त्वरित पावले उचलण्यात यावेत, अशी मागणी केली.

Dadar Rail Station
डॉ. आंबेडकरांनी फक्त घटनाच नाही तर देशाला दिशा देण्याचे काम केले.

दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानमित्त एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आज सकाळी चैत्यभूमीवर आले होते. त्यांनी डॅा बाबासाहेबांना अभिवादन केले. मात्र, त्याआधी त्यांना काही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. डॅा.बाबासाहेबांना अभिवादन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

यानंतर वानखेेडे यांनी चैत्यभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत चर्चा केली. मात्र, दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, ते मुस्लिम असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यानंतर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राची तपासणी जात पडताळणी समितीकडून केली जात आहे. यानंतर काही संघटनांकडून वानखेडे यांना जोरदार विरोध होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com