'जिलेबी कितीही आडवळणी असो'; अमृता फडणवीसांच्या उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

Devendra Fadnavis Birthday| देवेंद्र फडणवीस आज 52 वाढदिवस साजरा करत आहेत.
Devendra Fadnavis Birthday|
Devendra Fadnavis Birthday|

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांचा आज 52 वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे सोशल मिडीयावर कायम सक्रिय असलेल्या त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत त्यांनी दोघांचा एक फोटोही शेअर केला आहे.

"जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीस जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !'' असे ट्विट करत त्यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Devendra Fadnavis Birthday|
Vinod Tawde : मुर्मूंचा ऐतिहासिक विजय अन् विनोद तावडेंच्या शिरपेचात आणखी एक तुरा

- कोण आहेत देवेंद्र फडणवीस
22 जुलै 1970 रोजी नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. वयाच्या 27व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. 31 ऑक्टोबर 2014 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.वयाच्या 44 व्या वर्षी शरद पवार यांच्यानंतर ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले.

महाविकास आघाडीच्या काळातही एक सक्षम विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका बजावली. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. महाराष्ट्रात भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची ओळख आहे. 23 नोव्हेंबर 2019 रोजी फडणवीसांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण फक्त तीन दिवसातच म्हणजे 26 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com