Raj Thackeray Interview : राज ठाकरेंकडे फडणवीसांची तक्रार ; "त्यांनी थोड घरी पण लक्ष दिलं पाहिजे.."

Amruta Fadnavis ON Devendra Fadnavis : "मला तुमच्या घरच्या प्रश्नात आणू नका,"
Raj Thackeray Interview
Raj Thackeray Interview Sarkarnama

Amruta Fadnavis Took Interview of Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. कोल्हे आणि फडणवीस यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर राज ठाकरे यांनी हजरजबाबीपणे उत्तरे दिली.

"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय सल्ला द्याल,? असा प्रश्न अम़़ता फडणवीस यांनी राज ठाकरेंना केला. यावर ठाकरेंनी 'वर (केंद्राकडे) नीट संबंध ठेवा," असा सल्ला दिला. यानंतर अम़ता यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक तक्रार केली.

मला तुमच्या घरच्या प्रश्नात नका आणू

"फडणवीस यांनी वर लक्ष्य दिलं पाहिजे, असे तुम्हा म्हणता, पण त्यांनी घरी पण थोड लक्ष दिलं पाहिजे, " असे अमृता म्हणाल्या. त्यावर राज ठाकरे म्हणाले, "मला तुमच्या घरच्या प्रश्नात आणू नका," असे राज ठाकरेंनी उत्तरं दिले

Raj Thackeray Interview
Karnataka Election : राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पडायची वेळ आलीयं..,काँग्रेसचा हात थांबलायं ; स्मृती ईराणींचा घणाघात

या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. एका कार्यक्रमात हे तिघंही एकाच व्यासपीठावर होते.

Raj Thackeray Interview
Delhi Mayor Election : दिल्लीवर सलग दुसऱ्यांदा APP चा झेंडा ; महापौरपदी शैली ओबेरॉय बिनविरोध ; भाजपच्या शिखा रॉय...

..ते नाले साफ करणे गरजेचे

यावेळी राज ठाकरेंना राज्यातील राजकीय नेत्यांवर ईडी, सीबीआयकडून सुरू असलेल्या छापेमारीबाबत अमोल कोल्हे यांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “अनेक ठिकाणी तपास यंत्रणा चुकीच्या राबवल्या जात आहेत यामध्ये दुमत असण्याचे काही कारण नाही. पण अनेक ठिकाणी तपास यंत्रणा या खऱ्याही राबवल्या जात आहे. अनेक गोष्टी वर्षानुवर्षे तुंबलेल्या आहेत. ते नाले साफ करणे गरजेचे आहे. कुणीतरी एकाने गोष्ट करून ठेवायाची आणि पुढचे दामदुपट्टीने जास्त जोरात करतात”

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com