अमृता फडणवीस म्हणतात... "ये दोस्ती हम नही तोड़ेंगे... महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत"

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी शिवसेनेला (Shivsena) डिवचले
Amruta Fadnavis, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Amruta Fadnavis, Devendra Fadnavis, Eknath Shindesarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबतचा एक फोटो अमृता फडणवीस यांनी शेअर केला आहे. फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने फोटो शेअर करत अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार गेल्या 37 दिवसांपासून रखडला आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या सुरुच आहे. शिंदे आणि फडणवीस आजही दिल्लीत आहेत. अमृता फडणवीस यांनी आज फ्रेंडशीप डेचे औचित्या साधत #friendshipday हॅशटॅग करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Amruta Fadnavis, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Uday Samant Attack : शिवसेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

मात्र, फोटोला दिलेल्या कॅप्शनने राजकीय वर्तुळाचे चांगलेच लक्ष वेधले आहे. त्यांनी पोस्ट करताना म्हटले की ''ये दोस्ती हम नही तोड़ेंगे, महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत'' यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना टॅग केले. सोबत #friendshipday, असा हॅशटॅग वापरला आहे.

Amruta Fadnavis, Devendra Fadnavis, Eknath Shinde
MNS On Sanjay Raut : राऊतांना जेल मधून लिखानाची परवानगी ?; मनसेचा 'रोखठोक' प्रश्न

दुसरीकडे 'बस बाई बस' या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुबोध भावे यांनी अमृता फडणवीस यांना 'कशी नशिबान थट्टा आज मांडली' हे गाणे ऐकवले. हे गाणे ऐकल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावाचा उल्लेख केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in