अमृता फडणवीस यांना ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ पुरस्कार

अमृता फडणवीस या सोशल मीडिया आणि त्यांच्या गाण्यांमुळे सतत चर्चेत असतात.
Amruta Fadnavis in Cannes Film Festival Latest Marathi News
Amruta Fadnavis in Cannes Film Festival Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या गाण्यांसह ट्विटमुळे सतत चर्चेत असतात. त्यांना कलेची आवड असल्यामुळे 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवातही त्यांनी हजेरी लावली आहे. याच महोत्सवात त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. (Amruta Fadnavis Latest Marathi News)

महोत्सवात बेटर वर्ल्ड फोरमच्यावतीने फडणवीस यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अर्थपूर्ण आणि महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी, जगावर सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. फडणवीस यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. (Amruta Fadnavis received award in Cannes Film festival)

Amruta Fadnavis in Cannes Film Festival Latest Marathi News
समीर वानखेडेंवर कारवाई होणार? गृहमंत्री वळसे पाटलांनीच केली मागणी

अमृता फडणवीस यांनी महोत्सवात भारताच्या अनुषंगाने ‘अन्न, आरोग्य आणि शाश्वत विकास’ याबाबत जनजागृती केली आहे. महोत्सवातील मास्टरमाइंड फोरमध्ये त्यांनी याबाबतचे भाषणही केले. बेटर वर्ल्डने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

फडणवीस यांची कान्स चित्रपट महोत्सवातील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. त्या 21 मे रोजीच कान्समध्ये दाखल झाल्या आहेत. त्या सोशल मीडियात सतत सक्रीय असतात. महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राजकारणावर त्यांच्याकडून ट्विट केली जातात.

त्यावरून त्या ट्रोलही होतात. पण कुणाच्याही बापाला घाबरत नाही, असं म्हणत त्यांनी एका कार्यक्रमात ट्रोल करणाऱ्यांना इशाराही दिला होता. भारतीय जनता पक्षासह विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सतत सहभाग असतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com