Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी माझा गळा पकडला असं वाटतं !

Amruta Fadnavis news update | नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून नवऱ्याने गळा पकडल्यासारखं वाटण्यापेक्षा मला माझ्य् नवऱ्याने हात धरणं अधिक आवडतं.
Amruta Fadnavis , Devendra Fadnavis
Amruta Fadnavis , Devendra Fadnavissarkarnama

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या समाजमाध्यमांवर नेहमीच सक्रिय असतात. त्यांच्या विधानामुळे आणि टि्वटमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. (Amruta Fadnavis news update)

सध्या एका दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती, यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तर दिले. यावर समाज माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.

या कार्यक्रमात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतच्या भावनिक नात्यासंबधी स्पष्टीकरण दिले. अमृता फडणवीस गळ्यात मंगळसूत्र (Mangal Sutra) घालत नाहीत, यावर त्यांना सुत्रसंचालकाने प्रश्न विचारला. "तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घालत नाहीत तर तुमची सासू म्हणजे देवेंद्र फडणवीसांची आई तुम्हाला रागवत नाहीत का? त्यावर अमृता म्हणाल्या, "मी गळ्यात मंगळसूत्र घातलं तर माझ्या नवऱ्याने म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी माझा गळा धरल्यासारखं वाटतं म्हणून मी गळ्यात मंगळसूत्र घालत नाही,"

Amruta Fadnavis , Devendra Fadnavis
N V Ramana : ठाकरे-शिंदे संघर्षांची सुनावणी करणाऱ्या सरन्यायाधीशांचा असा ही एक विक्रम !

"मी गळ्यात मंगळसूत्र घालत नसले तरी हातात मंगसूत्र घालते कारण देवेंद्र फडणवीसांनी माझा गाळा धरण्या ऐवजी माझा हात धरलेला मला अधिक आवडत म्हणून मी गळ्यात मंगळसूत्र घालण्या ऐवजी हातात मंगळसूत्र घालते. नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून नवऱ्याने गळा पकडल्यासारखं वाटण्यापेक्षा मला माझ्य् नवऱ्याने हात धरणं अधिक आवडतं," असे उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं.

फडणवीस पंतप्रधान होतील का?

अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना अमृता फडणवीस थोड्याशा गोंधळल्या. त्या म्हणाल्या, ‘माहिती नाही. ते मुख्यमंत्री होतील, हेच मला कधीही वाटलं नव्हतं. त्यामुळे पंतप्रधान तर वाटूच शकत नाही.’ “पंतप्रधान पद हे असे आहे की त्यावेळी देशाच्या हितासाठी काय चांगलं आहे हे लक्षात ठेवून करावं. आता सध्या नरेंद्र मोदींशिवाय इतर कोणीही देशासाठी चांगले नाही हे मला समजतंय. पुढे १० ते २० वर्षे गेल्यानंतर तेव्हा त्या पदासाठी कोण पात्र असेल हे मी आताच सांगू शकत नाही. त्यामुळे ते पंतप्रधान होतील की नाही हे मला माहिती नाही”,

मी कधी ब्युटी पार्लरमध्ये गेले नव्हते...

अमृता फडणवीस यांना अनेकदा त्यांच्या मेकअप वरुनही ट्रोल केले जाते या कार्यक्रमात त्यांना त्यांच्या मेकअप वरुनही प्रश्न विचारला असता त्यांनी तितक्याच दिलखुलासपणे उत्तर दिलं आहे. प्रेक्षकांमधील एका महिलेनं तुम्ही प्लास्टिक सर्जरी केलीये?' असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देत अमृता म्हणाल्या की, 'बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण अनेकदा मला याबाबतीत अनेकांनी ट्रोल केलं. प्लास्टिक सर्जरी करायला खूप हिंमत लागते. यामध्ये एक रिस्कसुद्धा आहे. की जर काही चुकलं तर तुमचा चेहराही बिघडू शकतो. लग्नाच्या आधी मी कधी ब्युटी पार्लरमध्ये गेले नव्हते. फक्त लग्नाच्या वेळेस मेक-अप केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in