‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से ;अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

उत्तरप्रदेशात आत्तापर्यंत जवळपास ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत.
amruta fadanvis,Uddhav Thackeray
amruta fadanvis,Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : महाराष्ट्रात भोंग्याच्या मुद्यावरुन वाद पेटला आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सूचनेवरुन उत्तर प्रदेशातील अनेक धार्मिक स्थळांवरील भोंगे एकतर खाली करण्यात आले आहेत नाहीतर त्यांचा आवाज कमी करण्यात आला आहे.

योगी सरकारच्या या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले आहे. माजी मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadanvis) यांनी टि्वट करीत ठाकरे सरकारला (Uddhav Thackeray) डिवचलं आहे.

उत्तरप्रदेशात आत्तापर्यंत जवळपास ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही टि्वट करीत योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केलं आहे.

amruta fadanvis,Uddhav Thackeray
सत्तेचे लोणी खाण्यासाठी शिवसेनेनं कंत्राटदारांची तळी उचलली ; दरेकरांचे टीकास्त्र

राज ठाकरे यांनी याबाबतचे टि्वट केले आहे."उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'! महाराष्ट्र सरकारला सदबुध्दी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना," असे ठाकरे यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

“ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”, अशा शेलक्या शब्दात अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. यातून त्यांनी अप्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

amruta fadanvis,Uddhav Thackeray
आघाडीतील नेत्यांनी योगींचा क्लास लावावा ; आशिष शेलारांचा टोमणा

एक तारखेला औरंगाबाद येथे होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. तर दूसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जाहीर सभेची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील सोमय्या मैदानावर ही सभा होणार असून या सभेला ‘बूस्टर डोस’ सभा असे नाव देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com