Amruta Fadnavis Blackmail Case: फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी मोठी अपडेट; बुकी अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा..

Amruta Fadanvis blackmail case : मुंबईच्या विशेष पोलिस पथकाने हे आरोपपत्र दाखल केलं आहे.
Amruta Fadanvis blackmail case news update
Amruta Fadanvis blackmail case news updateSarkarnama

Amruta Fadanvis blackmail case : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप असणा-या तिन्ही आरोपींवर मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा, अनिक्षाचा चुलत भाऊ निर्मल यांच्याविरोधात मुंबईच्या विशेष पोलिस पथकाने हे आरोपपत्र दाखल केलं आहे.

Amruta Fadanvis blackmail case news update
Imran Khan News : इम्रान खान यांच्या घराबाहेर पोलिसांचा घेराव ; लष्कराने दिले हे दोन पर्याय

तीन महिन्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने जयसिंघानी गुजरातमधून ताब्यात घेतलं होते. जयसिंघानी याला अटक केल्याने या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा हिलाही पोलिसांनी अटक केली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा हिने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. अमृता यांना एक कोटी रुपयांच्या लाचेचीही ऑफर दिली होती. दोघांनी त्यांना धमकीही दिली होती.

Amruta Fadanvis blackmail case news update
Pune News : उद्धव ठाकरेंना करायला लावलं जी रे जी..! ; बावनकुळेंकडून नितेश राणेंचं कौतुक..

तसेच अमृता यांना टेक्स्ट मेसेज, व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल करण्यचा प्रयत्न केला होता. यामुळे अमृता फडणवीस यांनी अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी विरोधात मलबारहिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी उल्हानगरला जाऊन अनिक्षा हिला अटक केली होती. या प्रकरणात अनिक्षाचा चुलत भाऊ निर्मल याचेही नाव समोर आले आहे.

अमृता फडणवीसांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी अनिक्षा आणि अनिल हे दोघेही अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करत होते. याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com