उमेश कोल्हे हत्या प्रकरणात NIA कडून स्पष्टीकरण ; आंतरराष्ट्रीय कनेक्शन ?

या प्रकरणाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता असल्याचेही एआयएने एफआयआरमध्ये म्हटले आहे.
Umesh Kolhe
Umesh Kolhesarkarnama

नवी दिल्ली : अमरावतीतील (Amravati)केमिस्ट उमेश कोल्हे (Umesh Kolhe)हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) एफआयआर दाखल केला आहे. यात धर्माच्या आधारावर समाजात दहशत माजवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे एक मोठं षडयंत्र असल्याचं एनआयएनं म्हटलं आहे. (Umesh Kolhe news update)

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा हिच्या समर्थनार्थ काही पोस्ट शेअर केल्यामुळे अमरावतीतील एका केमिस्टची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते.

कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी शोएब खान,अतीब रशीद, मुदस्सीर अहमद, शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक, युसूफ खान बहादूर खान आणि शाहीम अहमद फिरोज अहमद यांना अटक करण्यात आली आहे.

अमरावतीच्या घनश्याम नगर भागात राहणारे कोल्हे हे दुकानातून घरी परतत असताना रात्री दहाच्या सुमारास त्यांची हत्या करण्यात आली.

Umesh Kolhe
भाजपकडून IT प्रभारीची हकालपट्टी : पैगंबरांविरुद्ध केले होते टि्वट

एनआयएने(NIA)बुधवारी या प्रकरणी 13 ठिकाणी झडती घेतली आणि विविध कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता असल्याचेही एआयएने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

अमरावती येथील कोतवाली पोलीस ठाण्यात 21 जून रोजी कोल्हेच्या निर्घृण हत्येची माहिती मिळाली आणि मृताचा मुलगा संकेत कोल्हे याच्या तक्रारीवरून 22 जून रोजी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, असे एफआयआरमध्ये नमूद केलं आहे.

एनआयएने केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी 2 जुलै रोजीबेकायदा प्रतिबंध कायदा 1967 आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 16, 18 आणि 20 अंतर्गत पुन्हा गुन्हा नोंदवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com