Amol Mitkari : मातोश्रीवर गेलो, उद्धव ठाकरेंनी मला 'खोका' दिला!

Amol Mitkari : ज्यांनी खोके घेतले, त्यांनी सांगावे, शिंदे गटाला टोला.
Eknath shinde, Amol mitkari
Eknath shinde, Amol mitkariSarkarnama

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून शिंदे - फडणवीस सरकारला विरोधकांकडून खोके सरकार म्हणून डिवचण्यात येत आहे. '५० खोके, एकदम ओके,' या घोषणेने विधिमंडळाचे परिसर विरोधकांनी दणाणून सोडले होते. आता खोके या शब्दावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मिश्कील शब्दात भाष्य केले आहे. मातोश्रीवर गेलो होतो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मला एक खोका दिला, असे म्हणत त्यांनी नाव न घेताच शिंदे गटाला खोचक टोला लगावला.

Eknath shinde, Amol mitkari
Bharat Jodo यात्रेसाठी 'तिने' एअर इंडियाच्या नोकरीवरही पाणी सोडले...

मिटकरी यांनी नुकतीच मातोश्रीवर हजेरी लावत सहपरिवार उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी शिवसेना नेते प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. यानंतर मातोश्रीबाहेर पडताना मिटकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर खोचकपणे टिपण्णी केली. मला आताच मातोश्रीवर एक खोका मिळाला. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एक खोका दिला. त्यामध्ये त्यांनी मला एक चॉकलेट दिले, असे उपहासात्मक वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले.

Eknath shinde, Amol mitkari
Narendra Modi : मोदी म्हणतात, 'मी थकत नाही कारण, रोज दोन-अडीच किलो शिव्या खातो.'

ज्यांनी खोके घेतले, त्यांनी सांगावे :

मातोश्रीवरून आपल्याला मला एक खोका मिळालाय. पण हा खोका म्हणजे गोडवा वाढवणारा खोका आहे. ज्यांनी ज्यांनी खोके घेतले असतील, त्यांनी ते अगदी उघडपणे सांगावे, असे खोचकपणे त्यांनी शिंदे गटावर वार केला. तर भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अ्ध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरें यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे यांचं वक्तव्य हे अंधश्रद्धेला खतपाणी टाकणारे आहे. या वक्तव्याची दखल घ्यावी. बावनकुळे यांच्यावर या संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे मिटकरी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in