अमोल किर्तीकरांनी थोपटले वडिलांविरोधात दंड; शिवसेनेच्या बैठकीला हजेरी लावत केला 'हा' निर्धार!

खासदार गजानन किर्तीकर यांनी जरी पक्ष बदलला असला तरी त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांनी मात्र निष्ठा काय असते, हे आज दाखवून दिले आहे.
Subhash Desai- Amol Kirtikar
Subhash Desai- Amol KirtikarSarkarnama

मुंबई : मुंबईतील शिवसेनेचे (Shivsena) खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शुक्रवारी (ता. १२ नोव्हेंबर) रात्री बाळासाहेबांच्या शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट Eknath Shinde) प्रवेश करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी धक्का दिला. बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेले किर्तीकर हे पक्ष सोडतील, असे ठाकरेंना वाटत नव्हते. मात्र, किर्तीकर यांनी शिंदे गटाबरेाबर घरोबा केला. मात्र, त्यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला आहे, त्यामुळेच त्यांनी ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावत पित्याच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे गोरेगावमधील लढाईकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. (Amol Kirtikar attends Shiv Sena meeting despite MP Gajanan Kirtikar's defection)

खासदार गजानान किर्तीकर यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुल चर्चा सुरू होती. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किर्तीकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली हेाती. त्यावेळी किर्तीकरांच्या पक्षांतराच्या बातम्या रंगल्या हेात्या. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणे धक्कादायक मानले जात आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबई महापालिकेबाबत रणनीती आखली जात असताना दुसरीकडे एक-एक शिलेदार सोडून जात असल्याने ठाकरे गटापुढील अडचणी वाढल्या आहेत.

Subhash Desai- Amol Kirtikar
'अशा लोकांमुळे आम्हाला पाटील म्हणून घ्यायची लाज वाटेल' : उमेश पाटलांचा राजन पाटलांवर हल्लाबोल

खासदार गजानन किर्तीकर यांनी जरी पक्ष बदलला असला तरी त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांनी मात्र निष्ठा काय असते, हे आज दाखवून दिले आहे. किर्तीकरांनी पक्ष सोडल्यानंतर आज सकाळी ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची पक्षबांधणीसाठी बैठक आयोजित केली हेाती. त्या बैठकीला अमोल किर्तीकर यांनी हजेरी लावली. त्याबाबतची माहिती अमोल किर्तीकर यांनी स्वतःच फेसबुक पोस्ट लिहित दिली आहे.

अमोल किर्तीकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली. या वेळी शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात देसाई यांनी मार्गदर्शन केले. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव विधानसभेतील सर्व प्रभागांतून शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.

Subhash Desai- Amol Kirtikar
पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच असतात पोरं, त्याचा आम्हाला स्वाभिमान : राजन पाटलांचे वादग्रस्त विधान

या बैठकीत मुंबई महापालिका निवडणूक, त्या दृष्टीने पक्षबांधणी आणि शिंदे गटाला रोखण्याची रणनीती यावर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीचे फोटो शेअर गजानानत किर्तीकर यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट केले आहेत. एका फोटो व्हिक्ट्रीची साईन दाखवण्यात आली आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत अमोल किर्तीकर यांनी वडिल गजानन किर्तीकर यांच्या विरोधात दंड थोपटल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in