
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मनविसेच्या पुनर्बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे. पहिल्याच टप्प्यात त्यांनी मनविसेचे सात विभाग अध्यक्ष बदलले आहेत. नव्या विभाग अध्यक्ष पैकी बहुतेक जण हे मनविसेच्या दुसऱ्या फळीत होते, तर काही नवीन चेहऱ्यांनाही अमित यांनी पुढे आणलं आहे. काही निवडक ठिकाणी मात्र त्यांनी जुनेच विभाग अध्यक्ष कायम ठेवले आहेत.
मनविसेचे मुंबईतील नवीन चेहरे - नवीन विभाग अध्यक्ष : वरळी - वैभव मांजरेकर, मानखुर्द - प्रकाश हंगारगे, घाटकोपर पूर्व - रोहन अवघडे, घाटकोपर पश्चिम - समीर सावंत, विक्रोळी - प्रथमेश धुरी, मुलुंड - प्रवीण राऊत, भांडूप- प्रतीक वंजारे. आधीचे, पण नव्या यादीतही कायम असलेले मनविसेचे विभाग अध्यक्ष : वडाळा - ओमकार बोरकर, श्रीमती मीनल सोनावणे(विद्यार्थिनी), शिवडी - उजाला यादव, माहीम - अभिषेक पाटील.
गेल्या सात दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांनी मुंबईतील १५ विधानसभा मतदारसंघातील मनसे पक्ष कार्यालयांना भेटी देऊन मनविसेचे पदाधिकारी आणि कॉलेजमधील नवीन तरुण तरुणींना प्रत्यक्ष भेटत आहेत, त्यांच्याशी थेट बोलत आहेत.
या १५ विधानसभेतील मनविसेच्या १५ विभाग अध्यक्षपैकी ७ विभाग अध्यक्ष त्यांनी बदलले आहेत, ३ विभाग अध्यक्ष आधीचे कायम ठेवले आहेत, तर उर्वरित ५ विधानसभा साठीच्या नेमणुका ते पुढच्या आठवड्यात करणार आहेत. मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान मुंबईच्या सर्वच्या सर्व म्हणजे ३६ विधानसभा मतदासंघामध्ये राबवण्यात येत आहे.
प्रत्येक विभागात त्यांना किमान २०० नवतरुण विद्यार्थी विद्यार्थिनी भेटायला येत असून आतापर्यंत त्यांनी सुमारे ३००० हजार विद्यार्थ्यांशी वैयक्तिक तसंच गटागटाने संवाद साधला आहे. अमित ठाकरे मनविसेचे अध्यक्ष झाल्यापासून महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण आहे. नव्या दमाच्या तरुणांना मनविसेत महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या त्यांच्या धोरणामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते नव्या ऊर्जेने कामाला लागले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.