गणेशोत्सवात मुंबईत असणं, हा एक विशेष अनुभव... : अमित शहांनी व्यक्त केल्या मराठीतून भावना

मुंबईत आज लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन.
Amit Shah
Amit ShahSarkarnama

मुंबई : मुंबईतील (Mumbai) लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मराठीतून ट्विट करत शिक्षक दिनाच्या (Teacher Day) शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं, हा एक विशेष अनुभव आहे, अशा भावना शहा यांनी ट्विटरद्वारे मराठीतून व्यक्त केल्या आहेत. (Amit Shah took darshan of King Ganesha of Lalbagh)

Amit Shah
मंत्र्यांना निवडणुकीची चाहूल; दिवाळीपूर्वी रंगणार या महापालिकांमध्ये रणधुमाळी!

मुंबईतील लालबागचा राजा गणेशाच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री शहा हे सहकुटुंब आज (ता. ५ सप्टेंबर) मुंबईत आले आहेत. त्यावेळी त्यांनी मराठीत ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं, हा एक विशेष अनुभव आहे. मुंबईत आज लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन. शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए. एम. नाईक विद्यालयाचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे.

मुंबईत आल्यानंतर अमित शहा यांनी प्रथम लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन, गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभले. विघ्नहर्ता बाप्पाचा आशीर्वाद सर्वांवर राहो, अशी प्रार्थनाही केली. या वेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, विनोद तावडे होते.

Amit Shah
...अन्‌ सुधीर मुनगंटीवार मध्यरात्री बारा वाजता पोचले रुग्णालयात!

लालबागच्या दर्शनानंतर सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या गणेशाचे दर्शन अमित शहा यांनी घेतले. त्यानंतर शेजारच्या मेघदूत बंगल्यावर भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना अमित शहा हे सध्या मार्गदर्शन करत आहेत. माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करत अमित शहा यांनी मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com