शिंदेंची तिसरी पिढीही शहांच्या पसंतीला; रुद्रांशंने खिळवून ठेवली नजर

Amit Shah : श्रीकांत.. कितना प्यारा बच्चा है!
Shrikant Shinde, Amit Shah, Rudransh Shinde Latest News
Shrikant Shinde, Amit Shah, Rudransh Shinde Latest NewsSarkarnama

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर भाजपच्या (BJP) नेत्यांची बैठक बोलावली होती. यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे 'वर्षा'बंगल्यावर गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नातवाने शहांची नजर खिळवून ठेवली. शहा यांच्या भेटीदरम्यान खासदार श्रीकांत शिंदेंचा मुलगा रुद्रांश हा बागडत होता. त्यावेळी शहांनी रुद्रांशंची भेट घेत श्रीकांत, कितना प्यारा बच्चा है, असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे. (Shrikant Shinde, Amit Shah, Rudransh Shinde Latest News)

Shrikant Shinde, Amit Shah, Rudransh Shinde Latest News
..तर मुंबई महापालिकेत 'आरपीआय'चा महापौर होईल...

अमित शहा हे रविवारी मुंबईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबई पालिका निवडणुकीबाबत आणि राज्यातील भाजप नेत्यांसोबत बैठकी घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शासकीय वर्षा बंगल्यावर जावून गणपती बाप्पांचं दर्शन घेतल. शहांचा हा मुंबई दौरा आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

शिंदेंच्या घरी आल्यानंतर अनेक राजकीय मंडळी यावेळी उपस्थित होती. मात्र इतकं असूनही शिंदे यांच्या नातवाने शहांची नजर खिळवून ठेवली होती. शहा आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात गप्पा रंगत असतांना रुद्रांश हा शहांभोवती बागडत होता. त्याच ते निरागस खेळणं, बागडण शहांना आवडलं आणि त्यांनी रुद्रांशंची भेट घेतली आणि रुद्रांशंचे वडील खासदार श्रीकांत शिंदे यांना "श्रीकांत, कितना प्यारा बच्चा है," असे शहांनी म्हटलं.

Shrikant Shinde, Amit Shah, Rudransh Shinde Latest News
भाजप, शिवसेनेला आणखी धक्के देण्याच्या तयारीत; स्थानिक स्वराज्य संस्थांवरही लक्ष

दरम्यान, शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर त्यांनी भाजपसोबत नवं सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र शपथविधीच्या इतक्या गर्दीतही शिंदे हे आपल्या नातवाला घेऊन उभे होते. हे संपूर्ण राज्याने बघीतले होते. तसेच, सरकार स्थापन झाल्यावर मंत्रीमंडळ विस्तार लांबल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनाच राज्याचा कारभार चालवावा लागत होता. यामुळे त्यांची मोठी धावपळ होत होती. त्यात विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंचा नातू रूद्रांशंची (Rudransh Shinde) तब्येत बिघडली आणि त्याला बेलापूर येथील अपोलो रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यामुळे शिंदेंनी आपल्या लाडक्या नातवाच्या तब्येतीची विचारपूस आणि काळजी म्हणून ते तब्बल चार तास रूग्णालयात थांबले होते. यामुळे शिंदेंच्या नातू प्रेमाची चर्चा झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com