Amit Shaha In Mumbai : अमित शहा मुंबईत दाखल; महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन!

Amit Shaha In Mumbai : अमित शाह यांच्या दौऱ्यामागची पाच प्रमुख कारणे..
Amit Shaha In Mumbai : अमित शहा मुंबईत दाखल; महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन!

Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा मुंबई दौरा आज आणि उद्या नियोजित आहे. सह्याद्री अथितीगृहावर अमित शाह यांचा राज्यातील भाजप नेत्यासोबत बैठक पार पडणार आहे. तसेच, महाराष्ट्र भूषण वितरण सोहळ्याला देखील अमित शाह उपस्थित राहणार आहेत, असे असले तरी आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूकीच्या दृष्टीकोनातून शाह यांच्या दौऱ्यावर पाहिले जाते.

अमित शाह यांच्या दौऱ्यामागची पाच प्रमुख अजेंडे -

1 ) मुंबई पालिकेसाठी रणनीती :

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याचीही शक्यता आहे. यामुळे आगामी निवडणुकांसाठी

तयारी हा या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे.

Amit Shaha In Mumbai : अमित शहा मुंबईत दाखल; महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन!
Jayshree Palande : पक्षाने फ्री हॅण्ड दिल्यास शिरूरमधील सर्व संस्था भाजपच्या ताब्यात आणून दाखवेन : जयश्री पलांडेंचे अप्रत्यक्ष पवारांना चॅलेंज

2) ठाकरे गटाची चाचपणी :

शिवसेनेतल्या फुटीनंतर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने बहाल केले. यावरही सर्वोच्च न्यायालयात संघर्ष सुरू आहे. मात्र सद्यस्थितीत खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे. आयोगाच्या निर्णयानंतर आता ठाकरे गटाची शक्ती आणि शिंदे गटाला शिवसेना म्हणून जनमान्यता आहे का ? याचा धांडोळा ही भाजप कडून घेण्यात येणार आहे.

३) मनसेला सोबत घेण्याची शक्यता :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी एकला चलो रे ची भूमिका जाहीर केली असली तरी, मुंबई पालिकेत शक्ती निर्माण करण्यासाठी मनसेला सोबत घेता येईल का? अशी ही एक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज ठाकरे यांचा मागील काही दिवसांपासूव एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते यांच्याशी भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यामुळे निवडणुका जवळ असताना मनसे भाजप आणि शिंदे गट अशी युती होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Amit Shaha In Mumbai : अमित शहा मुंबईत दाखल; महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन!
Jayashree Thorat बघा नेमकं काय म्हणाल्या ? | Satyajeet Tambe | Sangamner | Ugly Chaal | Sarkarnama

४) जागांवाटपासाठी फॉर्म्युला :

आगामी मुंबईच्या निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदे गटात जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार, याबाबत ही महत्त्वाची चर्चा भाजपच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. मुंबईसाठी शिवसेना नेहमी युतीच्या काळात भाजपपेक्षा अधिक जागा लढवत होत्या. मात्र आता राजकीय परिस्थिती बदललेली असताना, भाजप आणि शिवसेना जागांचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता आहे.

5) बूथ शक्तीकरणासाठी प्रयत्न :

आगामी निवडणुकांसाठी भाजपचं तळापर्यंत जाळं पसरवण्यासाठी मुंबईतील बूथ सक्षमीकरणावर भाजपकडून विशेष भर देण्यात येणार आहे. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायचीच या दृष्टीकोनातून अमित शहा नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com