Pension Scheme : नवीन पेन्शन योजनेमध्ये सुधारणा; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Changes in New Pension Scheme : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
Pension Scheme
Pension Scheme Sarkarnama

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोतवालांच्या मानधन वाढीचा निर्णय आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संप पुकारला आहे. तसेच हा संप मागे घेण्यात यावा, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

Pension Scheme
Solapur : राम सातपुतेंचा आरोप अन् चंद्रकांत पाटलांची ग्वाही! सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची होणार उच्चस्तरीय चौकशी

दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीवर अद्याप तोडगा निघालेला नाही. असे असतानाच आता राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत नवीन पेन्शन योजनेत सुधारणा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. नवीन पेन्शन योजनेत कुटुंब निवृत्ती वेतनाबाबतचा निर्णय सरकारने घेतला आहे.

त्यामुळे जुनी पेन्शनच्या मागणीसाठी संप पुकारलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नवीन पेन्शन योजनेत कुटुंब निवृत्ती वेतन नेमकं किती मिळणार? याबाबत अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही.

Pension Scheme
Supreme Court : एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाईल; पण सरकार टिकेल : सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलाने वर्तविला अंदाज

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झाले?

- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा निर्णय आज कॅबिनेटमध्ये झाला आहे.

- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

- शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू योगदान देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला आहे.

- कोतवालांच्या मानधन वाढीचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

- आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in