शिंदे सरकारचा शिवसेनेतील नेत्याला दणका; ११ वर्षांपासूनचे पोलीस संरक्षण काढले

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत असलेल्या शहरप्रमुखाचे पोलीस संरक्षण काढले
Arvind Wallekar
Arvind Wallekarsarkarnama

अंबरनाथ : अंबरनाथचे (Ambernath) शिवसेना (Shivsena) शहरप्रमुख अरविंद वाळेकर (Arvind Wallekar) यांचे पोलीस संरक्षण शिंदे सरकारने काढले आहे. अरविंद वाळेकर यांचे बंधू राजू वाळेकर यांचेही पोलीस संरक्षण काढल्याची माहिती मिळत आहे. वाळेकर हे अजूनही मूळ शिवसेनेत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) आहेत.

शिंदे गटातील अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याशी अरविंद वाळेकर यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांची काही दिवसांपूर्वी शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर पोलीस संरक्षण काढण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली आहे. वाळेकर यांच्यावर २०११ मध्ये शहर शाखेत जीवघेणा हल्ला झाला होता. तेव्हापासून त्यांना पोलीस संरक्षण होते.

Arvind Wallekar
ठाकरेंच्या आश्वासक शब्दानंतर हिंगोलीतील शिवसैनिक ठाम, बांगरांचे शक्तीप्रदर्शन फसणार...

दरम्यान, अंबरनाथमध्येही शिवसेनेच्या सुमारे २० माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. ठाणे येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची आमदार डॉ. बालाजी किणीकर, उप शहरप्रमुख परशुराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी अंबरनाथचे दोन माजी उप नगराध्यक्ष याशिवाय नगरसेवक, नगरसेविकांनी तसेच दोन स्वीकृत नगरसेवकांसह, दोन उपशहरप्रमुख आदींनी पाठिंबा दर्शवला होता.

Arvind Wallekar
OBC Reservation : सत्तेत असताना भूमिका बदलणे अपेक्षित नाही; पंकजांचा रोख कोणाकडे?

अंबरनाथमध्ये एकून ५७ नगरसेवक असून दोन अपक्ष नगरसेवकांसह शिवसेनेचे २५ संख्याबळ होते, त्यातील सुमारे १९ ते २० नगरसेवकांसह भाजपमधून (BJP) शिवसेनेत आलेल्या माजी दोन नगरसेवकांनी आणि शिवसैनिकांनी शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे शहरात शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. १७ मे २०२० रोजी नगरपालिकेची मुदत संपली होती. १९ मे २०२० पासून नगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. शिवसेनेतील घडामोडींबाबत योग्य वेळ आल्यावर भूमिका स्पष्ट करू असे, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्पष्ट केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in