Dasara Melava | बीकेसी मैदानात परवानगी द्या : शिवसेनेकडून पत्र

Dasra Melava : ऐनवेळी खबरदारीचा उपाय म्हणून बीकेसी मैदान पर्यायाचा विचार होत आहे.
DAsara Melava Uddhav thackeray
DAsara Melava Uddhav thackeraySarkarnama

मुंबई : दसरा मेळाव्यावरून (Dussehra Melava) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटले होते. शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर भरतो. प्रथेप्रमाणे यंदाही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी शिवसेनेकडून अर्ज करण्यात आला होता. मात्र, शिवसेनेत बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे दसरा मेळाव्यावरून दोन गटात जुंपली होती. एकीकडे हा वाद होत असतानाच, आता दसरा मेळावा बीकेसी येथे आयोजित करण्याची परवानगी द्यावी यासाठी शिवसेनेकडून MMRDA ला पत्र पाठवण्यात आले आहे.

DAsara Melava Uddhav thackeray
ऐनवेळी पत्ता कट झालेले शिरसाट म्हणाले, ‘मंत्रिपद मिळालं नाही; म्हणून एकनाथ शिंदेंना सोडून...’

यापूर्वी शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी देखील शिवसेनेकडून पत्र लिहण्यात आले होते, आता ऐनवेळी खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेकडून शिवाजी पार्कबरोबरच, बीकेसी मैदान पर्याय म्हणून विचार होत आहे. बीकेसी मैदानासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी MMRDA ला पत्र लिहले आहे.

शिवसेनेनं २२ ऑगस्टला मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला होता, परंतु शिवसेनेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. दरम्यान याबाबत उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच शिवाजी पार्कवर घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. "तात्रिंक-मांत्रिक बाबी काहीही असो दसरा मेळावा आम्ही शिवतीर्थावर घेणार, दसऱ्या मेळाव्याबाबत संभ्रम नाही, शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच," असे ठाकरेंनी ठणकावून सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in