आघाडीच्या आणाभाका आणि काही तासांतच आव्हाड-शिंदे एकमेकांना भिडले!

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महाविकास आघाडीचे संकेत दिले.
आघाडीच्या आणाभाका आणि काही तासांतच आव्हाड-शिंदे एकमेकांना भिडले!
Eknath Shinde-Jitendra Awhad sarkarnama

ठाणे : खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात रंगलेल्या राजकीय कोपरखळ्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीत लढण्याचे सूतोवाच केले होते. असे असताना अवघ्या काही तासांतच यात ठिणगी पडल्याचे दिसून आले. त्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. (Allegations between Jitendra Awhad and MP Shrikant Shinde)

नाते जपायला परिपक्व असायला लागते, मात्र ते अजून परिपक्व झालेले नाहीत, त्यांचे रक्त सळसळते आहे, त्यामुळे आपल्याला बापाच्या भूमिकेत जाऊन त्यांनी समजावून घेतले पाहिजे, असा सल्ला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला. त्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील मला परिपक्व व्हायचे नसल्याचे सांगत, मुलगा मोठा होत असताना, त्याचा त्रास बापाला होत असेल तर, हे नाते कसले, असा पलटवार केला.

 Eknath Shinde-Jitendra Awhad
राणेंच्या गावातील सोसायटीची निवडणूक; शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसला उमेदवारही मिळाला नाही!

कळवा येथील खारेगाव उड्डाणपुलावरून रंगलेल्या राजकीय कलगीतुरा शांत झाल्याचे दिसून येत होते. त्यात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महाविकास आघाडीचे संकेत दिले. या वेळी आव्हाड यांनी या पुलासाठी माजी खासदार आनंद परांजपे यांनीच पाठपुरावा केल्याचा उल्लेख करुन मंजुरीदेखील त्यांनीच मिळवून दिली आहे. पुलाचे काम का लांबले, याचे उत्तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील माहित असल्याचे त्यांनी सांगितले. सुरवातीपासून मी आघाडीचा धर्म पाळत आहे. राष्ट्रवादीच्या बाजूने आघाडी पक्की असून आता उर्वरीत निर्णय त्यांना घ्यायचा असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे आव्हाडांनी केलेल्या या हल्ल्याला खासदार शिंदे आणि महापौर म्हस्के यांनी पलटवार केला.

 Eknath Shinde-Jitendra Awhad
ठाकरेंनी आदेश दिल्यास कोल्हापूर उत्तर शिवसेनेच्याच मालकीचे असल्याचे दाखवून देऊ!

मला परिपक्व व्हायचे नसून मुलाच्या यशाने जर बापाला त्रास होत असेल तर त्या नात्याला काय म्हणावे, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी आव्हाड यांना लगावला. दुसरीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीलाच आघाडी नको असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे, तर महापौर निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली होती. असे असतानाही राष्ट्रवादीला महिला बालकल्याण समिती, प्रभाग समिती आणि परिवहनचे सदस्य दिले होते. त्या बदल्यात त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करून दिली होती, कदाचित आव्हाडांना त्याचा विसर पडला असेल म्हणून त्याची आठवण करुन देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 Eknath Shinde-Jitendra Awhad
‘गडकरी म्हणाले, हे शेवटचे सांगतो अन्‌ आम्हाला जमिनीचा दर कमी करावा लागला’

आमची मैत्री; पण त्यात एक अबोलपणा

खारेगाव येथील लोकार्पण सोहळ्यावेळी एकनाथ शिंदे आणि आमची मैत्री राजकारण पलीकडची आहे. त्यात एक अबोलपणा आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे तुम्ही कधी याबाबत विचारा, असे ॲड. आव्हाड हे खासदार श्रीकांत शिंदे यांना म्हणाले. निवडणुकीत महाविकास आघाडी होणार हे पहिल्या दिवसापासून बोलतोय, मी कधीही वागळे मिशनबद्दल बोललो नाही, असेही आव्हाड म्हणाले. तर आमची मैत्री आहे, हे खरे आहे, हे सर्वांसमोर खुले आहे. पोटात एक आणि ओटात एक असे आम्ही कधीच वागत नाही. निवडणुकांमध्ये आम्ही दोघे पक्षाचे काम करतो, पण निवडणूक संपल्यानंतर कोणतीही अडी ठेवत नाही, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

 Eknath Shinde-Jitendra Awhad
दूध संस्थेच्या संचालकांवर कोयत्याने वार : अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीमध्ये वाद

आघाडी होणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी ठणकावून सांगितले

लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री शिंदे व गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्यातील राजकीय टोलेबाजी रंगल्याचे चित्र दिसून आल्यानंतर पालिका निवडणुकीत एकत्रित महाविकास आघाडीतच लढण्याचे सूतोवाच या निमित्ताने केले. या वेळी सर्व कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला पालकमंत्री शिंदे आणि आव्हाड यांनी सांगत महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच होईल, असे देखील ठणकावून सांगितले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या घोषणाही दोन्ही नेत्यांनी दिल्या. तर या वेळी या पुलाचे नामकरण स्वर्गीय आनंद दिघे उड्डाणपुल असे करीत शिंदे आणि आव्हाड यांनी या पुलाची फीत एकत्रित कापली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in