'मुख्यमंत्री शिंदेच्या पीएकडून शिवसेना सहसंपर्कप्रमुखाला धमकी!'

शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामधील संघर्ष तापला आहे
Eknath Shinde, Gulabrao Wagh
Eknath Shinde, Gulabrao Waghsarkarnama

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून जळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमख गुलाबराव वाघ (Gulabrao Wagh) यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जळगावात (Jalgaon) शिवसेनेतर्फे (Shivsena) बंडखोरांच्या विरोधात भव्य आक्रोश मोर्चा सुरू असतांना ही धमकी आली, असल्याचे वाघ यांनी सांगितले.

शिवसेनेतर्फे जळगाव येथे आज बंडखोर आमदारांच्या विरोधात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला. शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत व रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, महापौर जयश्री महाजन, उपमहपौर कुलभूषण पाटील, महापालिकेचे शिवसेना गटनेते नितीन लढ्ढा, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, गजानन मालपुरे आदी नेते उपस्थित होते.

Eknath Shinde, Gulabrao Wagh
संजय कुटेंची गुगली... म्हणे मी सुरतला योगायोगाने गेलो होतो...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा निघत असतांनाच शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना धमकीचा फोन आला, आपण एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बोलत असून आपण त्यांच्या विरोधात का आंदोलन करीत असतात, आपण जीथे दिसाल तेथे तुम्हाला मारू अशी त्यांने फोनवरून धमकी दिल्याचे वाघ यांनी सांगितले. आपण मोर्चात असल्यामुळे त्याचा फोन रेकॉर्ड केला नाही. या प्रकरणी आपण पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करणार असल्याचेही वाघ यांनी सांगितले.

Eknath Shinde, Gulabrao Wagh
'बाळासाहेबांच्या मुलाला मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्याची आम्हालाही खंत’

या वेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यानी या धमकीचा निषेध केला आहे. आम्हाला धमक्या देवू नका असा त्यांनी ईशाराच दिला आहे. शिंदे यांच्या स्वीयसहाय्यकावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com