एकनाथ शिंदेंच्या बंडाचे जळगाव कनेक्शन : चंद्रकांत पाटलांनी राबविले `ऑपरेशन लोटस`

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला सुरतच्या पाटलांची रसद
Chandrakant Patil News, Eknath Shinde News, Operation Lotus in Maharashtra, Political Crisis in Maharashtra
Chandrakant Patil News, Eknath Shinde News, Operation Lotus in Maharashtra, Political Crisis in Maharashtrasarkarnama

जळगाव : शिवसेनेचे (Shivsena) आमदार फोडून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनासाठी भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) 'ऑपरेशन लोटस' राबविण्यात येत आहे. त्याचे मुख्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष व नवसारीचे (सुरत) चे खासदार सी. आर. पाटील (Chandrakant Patil) हे आहेत. त्यांचे मूळ कनेक्शन जळगाव जिल्ह्याशी आहे. शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह आमदारांनी बंड केले. सर्व आमदार रातोरात सुरत येथील ली मेडीयन हॉटेल येथे दाखल झाले आहेत. या सर्व आमदारांची महाराष्ट्रातून थेट गुजरात येथील हॉटेलमध्ये राहण्याची जबाबदारी सी. आर. उर्फ चंद्रकांत रघुनाथ पाटील यांनी घेतली आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)

खासदार पाटील हे गेल्या अनेक महिन्यपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनीच या बंडाला खऱ्या अर्थाने चालना दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील शिवसेना आमदार किशोर पाटील व पारोळा येथील शिवसेना आमदार चिमणराव पाटील यांचे खासदार पाटील यांच्याशी अत्यंत जवळचे संबध आहेत. त्यांची वेळोवेळी भेट होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे दोन्ही आमदारही सुरत येथे आहेत.(Political Crisis in Maharashtra)

Chandrakant Patil News, Eknath Shinde News, Operation Lotus in Maharashtra, Political Crisis in Maharashtra
शिंदेंच्या बंडामागे ना फडणवीसांची फूस, ना ठाकरेंवर नाराजी; खरा रोष अजित पवारांवर

खासदार सी. आर. पाटील हे मूळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते व आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकाराऊत हे त्यांचे मूळ गाव आहे. याच तालुक्यात त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले आहे. पुढे ते कामाच्या निमित्ताने गुजरात येथे गेले. त्या ठिकाणी त्यांनी नवसारी (गुजरात) येथे त्यांनी व्यवसाय सुरू केला. त्यामाध्यमातून त्यांची ओळख झाली, त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पुढे ते नवसारी महापालिकेचे नगरसेवक व महापौर झाले, त्यानंतर आमदार व नवसारीचे खासदार झाले. आजही ते खासदार आहेत.

Chandrakant Patil News, Eknath Shinde News, Operation Lotus in Maharashtra, Political Crisis in Maharashtra
एकनाथ शिंदेंच्या बंडाची प्राथमिक तयारी फडणवीस-पाटलांकडूनच

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या ते विश्‍वासातील आहेत. ते सद्या गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आजही त्यांचा जळगावशी संबध आहे. पिंप्री अकाराउत येथे त्यांची शाळा आहे. तर जळगाव येथे आदर्श नगरात त्यांचे घर आहे. महाराष्ट्रातील सत्तातंरासाठी आपरेशन लोटस ची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपविली आहे. विशेष म्हणजे ते यशस्वीपणे ती राबवित आहेत. महाराष्ट्रातील सत्तातरासाठी महाराष्ट्राच्या भूमीतील गुजरातमधील कर्तृत्वान मराठी माणूसच फिल्डींग लावत आहे. हेच खऱ्या अर्थाने महत्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com